शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तस्कर शिरजोर, अधिकारी कमजोर

By admin | Updated: April 10, 2015 23:39 IST

तहसीलदारांपुढे आव्हान : शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद, औरवाडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा

शिरोळ : कोट्यवधी रूपयांची वाळू चोरी करणाऱ्या वाळू तस्करीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कवठेगुलंद, औरवाड, शेडशाळ येथे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्यामुळे याला कोण आळा घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करण्याचे आव्हान तहसीलदार सचिन गिरी यांच्यासमोर उभे राहिले आहे.वाळूचे आगर म्हणून शिरोळ तालुक्याला संबोधले जाते. कोथळी, कवठेसार, चिंचवाड, उदगाव, घालवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, बस्तवाड, राजापूर, कुटवाड ही वाळूची मुख्य ठिकाणे असून वाळू लिलावातून १० कोटी रूपयाचे उद्दिष्ट होते. मात्र, महसूल विभागाला १२ कोटी रूपयाचा निधी मिळाला आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळाल्यामुळे शिरोळ महसूल विभागाचे गौणखनिजाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लिलाव झाल्यानंतर कोट्यवधी रूपयाची गुंतवणूक करणाऱ्या काही ठेकेदारांना महसूल विभागाने कब्जापट्टी व वाहतूक पावत्या नसतानाही ग्रीन सिग्नल दिला होता. मार्चमध्ये १७ बेकायदेशीर वाळू आवटीवर कारवाई करून तहसीलदार गिरी यांनी धडक मोहीम राबविली होती. धाडसी कारवाईमुळे वाळू तस्करांत खळबळ उडाली होती. सध्या औरवाड, कवठेगुलंद व शेडशाळ या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू झाला आहे. कोट्यवधी रूपयांची वाळू चोरी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. प्रशासन यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. यामुळे तहसीलदार गिरी यांच्यासमोर बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा उपशाला खतपाणी घालणाऱ्या महसूल विभागातील यंत्रणेवरही तहसीलदारांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. औरवाडमध्ये पाणी उपसा करणाऱ्या मोटारींजवळच वाळू उपसा सुरू असल्यामुळे दूषित पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रूपयाची वाळूची लूट सुरू असताना महसूल विभागाने गांधारीची भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी) लिलावधारकांची गळचेपीबेकायदेशीर वाळू उपशामुळे लिलाव बोलीतून रितसर वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांची मोठी गळचेपी झाली आहे. शासकीय परवानगीअभावी वाळू उपसा सुरू असल्यामुळे लाखो रूपये गुंतवून अधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.प्रांतांच्या भूमिकेकडे लक्षसांगली जिल्ह्यात नियमबाह्य वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारून बोटी जप्त केल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद, शेडशाळ व औरवाडमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असताना या विभागाचे प्रांताधिकारी त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.