शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणापेक्षा शिवराज्याभिषेक सोहळा महत्वाचा : संभाजीराजे छत्रपती

By संदीप आडनाईक | Updated: May 31, 2024 16:11 IST

तयारी पूर्ण : पाच लाखांहू्न अधिक शिवभक्त रायगडावर येणार

कोल्हापूर : राजकारण आणि शिवराज्याभिषेक मी एकत्र आणणार नाही, एक वेळ निवडणुका आणि राजकारण पुन्हा होतील, पण ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एकदाच होणार आहे. त्यामुळे ४ जूनपेक्षाही ५ आणि ६ जूनचा शिवराज्याभिषेक सोहळाही माझ्यासाठी महत्वाचा आहे, असे मत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराज छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तर, यंदा दुर्गराज रायगडावर पाच लाखांहून अधिक शिवभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी झाला. त्या क्षणाची स्मृती रहावी म्हणून २००७ पासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. प्रारंभी दोन हजार शिवभक्त होते, गतवर्षी ५ लाख शिवभक्त गडावर होते. यंदाही हा आकडा ओलांडून जाईल असे संभाजीराजे म्हणाले.
यावेळी समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी समितीने पूर्ण झाली असून, एकुण ३७ समित्या नियोजनबध्द काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

५ जून हा शौर्य आणि ६ जून हा भक्तीचा दिवस आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी ५ ठिकाणी अन्नछत्र आहे. शाहीरी कार्यक्रमात २३ शाहीर पोवाडे गाणार आहेत, पालखी मिरवणुकीत १०० मशाली आणि संबळवाद्य असेल, युध्दकला प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी राज्यातून ३५ संघ आणि २५० मावळे सहभागी होणार आहेत. पायथ्याला आणि गडावर मिळून ११ ठिकाणी आरोग्य केंद्र सज्ज राहणार आहेत, धर्मशाळा व इतर ठिकाणी महिलांसह इतर शिवभक्तांची थांबण्याची व्यवस्था केल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

या पत्रकार परिषदेला अमर पाटील, हेमंत साळोखे, सुखदेव गिरि, फत्तेसिंग सावंत, धनाजी खोत, उदय घोरपडे, प्रविण उबाळे, धनाजी खोत, दिलिप सावंत, अनुप महाजन, रणजित पाटील, दीपक सपाटे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.

असा आहे शिवराज्याभिषेक सोहळा

५ जून : दुपारी ३.३० वा : जिजाउ समाधीचे दर्शन (पाचाड), सायंकाळी ४ वा. संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती पायी गड चढण्यास प्रारंभ (नाणे दरवाजा), ४.३० वा : महादरवाजा पूजन व तोरण बांधणे, ५ वा : पंचक्राेशीतील २१ गावांतील सरपंच, गावकऱ्यांच्या उपस्थितीत शहाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन (नगारखाना), ५.३० वा. धार तलवारीची युध्दकला महाराष्ट्राची शिवकालीन युध्दकलांची मानवंदना (होळीचा माळ), ७.१५ वा. आतषबाजी, रात्री ८ वा : जागर शिवशाहीरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा (राजसदर) , ९ वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ (शिरकाई मंदिर), रात्री ९.३० वा. वारकरी संप्रदायाकंडून कीर्तन व भजन (जगदीश्वर मंदिर), 

६ जून : सकाळी ७ वा :रणवाद्यांच्या जयघोषात शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन (नगारखाना), ७.३० वा. शाहिरी कार्यक्रम (राजसदर), ९.३० वा. शिवरायांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन (राजसदर), १०.१० वाजता संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायाच्या उत्सवमूर्तीस अभिषेक (राजसदर) , १०.२० वा. शिवरायांच्या पुतळ्यास सुवर्णनाण्यांचा अभिषेक (मेघडंबरी), १०.३० वा. सभांजीराजे यांचे मार्गदर्शन, ११ वा. जगदीश्वराच्या दर्शनासाठी शिवरायांच्या मुख्य पाालखी सोहळ्यास प्रारंभ, १२ वा. जगदीश्वराचे दर्शन, १२.१० वाजता शिवरायांच्या समाधीस अभिवादन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती