शिरोळला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मेळावा

By Admin | Updated: December 30, 2016 00:13 IST2016-12-30T00:13:25+5:302016-12-30T00:13:25+5:30

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन होणार

Shirola meets tomorrow in the presence of Chief Minister | शिरोळला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मेळावा

शिरोळला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मेळावा

शिरोळ : मध्यवर्ती शासकीय इमारत व शिरोळ तालुका पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, शनिवारी दुपारी ३ वाजता हा समारंभ होईल, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली़
शिरोळ येथे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, तहसीलदार किरणकुमार काकडे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, आदींनी दोन्ही इमारतींची पाहणी केली़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणास भेट देऊन सभा नियोजनाबाबत चर्चा केली़
पंचायत समिती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना खा. शेट्टी पुढे म्हणाले, मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. सन २०१२ मध्ये माजी आमदार स्व़ सा़ रे़ पाटील यांच्या काळात प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होणार आहे़ त्यानंतर श्री पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर सर्वपक्षीय शेतकरी मेळावा होणार असून, यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, अपेक्षा व शासनाचे धोरण याविषयी मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे़ कृषिमंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच सरपंच यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

शिरोळ येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जिल्हाधिकारी अमित सैनी, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील यांनी गुरुवारी पाहणी केली.

Web Title: Shirola meets tomorrow in the presence of Chief Minister