शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘शाहू सांस्कृतिक’ बीओटीवर उभारणार, पावणेतीन वर्षे वास्तू अक्षरश: धूळ खात पडून

By राजाराम लोंढे | Updated: June 12, 2025 16:15 IST

सहकार विभाग व नेत्यांशी चर्चा करून प्रस्ताव अंतिम करणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या शाहू सांस्कृतिक मंदिराचे अखेर पावणेतीन वर्षांनी पांग फिटणार आहे. समिती प्रशासनाने ‘बीओटी’वर दुरुस्ती करून चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी वास्तू अक्षरश: धूळ खात पडून होती; पण गेल्या सहा महिन्यांत सभापती ॲड. प्रकाश देसाई यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

तावडे हॉटेलहून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दोन एकर जागेत १९७४ ला तत्कालीन संचालकांनी ‘शाहू सांस्कृतिक’ची उभारणी केली. यातून समितीला अनेक वर्षे चांगले उत्पन्न मिळत होते; पण २००१ ला संचालकांनी पंचरत्न एंटरप्रायजेस या कंपनीस २१ वर्षांच्या भाडे कराराने चालवण्यास दिला. वार्षिक केवळ एक लाख भाड्याने संबंधित कंपनीस दिले होते. यामध्ये समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. भाडेकराराची ऑक्टोबर २०२२ ला मुदत संपल्यानंतर समितीने इमारत ताब्यात घेतली.

वास्तविक त्याच वेळी थोडी डागडुजी करून वापरण्यास सुरुवात केली असती तर उत्पन्न सुरू झाले असते, पण या इमारतीकडे बघण्याचा संचालकांसह नेते मंडळींचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. त्यामुळे पावणेतीन वर्षे इमारत भंगारअवस्थेत पडून आहे. इमारतीसह दोन एकर परिसरात गवत उगवले आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणारी वास्तू भंगार अवस्थेत पडून राहिल्याने सभापती ॲड. देसाई यांनी नेत्यांसह संचालकांसोबत चर्चा करून बीओटीवर चालवण्यास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोल्हापूर शहरातील सर्वांत मोठे सभागृह

कोल्हापूर शहरात अनेक सभागृह आहेत; पण शाहू सांस्कृतिक मंदिर हे सर्वांत मोठे आहे. त्याची आसन क्षमता एक हजार खुर्च्यांची आहे.

दीर्घ मुदतीचा करार?

शाहू सांस्कृतिक मंदिरची डागडुजी करायची म्हटल्यास त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीने, पण मागील अनुभव पाहता, समितीच्या दृष्टीने सुरक्षित करार करून घेतला जाणार आहे.

शाहू सांस्कृतिक मंदिर बीओटीवर देण्याबाबत संचालक मंडळाने प्रस्ताव तयार केला असून, तो नेते मंडळींच्या समोर ठेवला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच निर्णय घेणार आहोत. - ॲड. प्रकाश देसाई (सभापती, कोल्हापूर बाजार समिती)