शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तरुणास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:52 IST

मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम

इचलकरंजी : येथील शहापूर पोलिसांनी मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाला अटक केली. ऋषभ राजू खरात (वय ३०, रा. लोकमान्यनगर, कोरोची) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ७० हजार २०० रुपये किंमतीचा १३४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ, रोख रक्कम व अन्य साहित्य असा ६ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस अधिक्षक यांच्या आदेशानुसार मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम सुरु आहे. या अनुषंगाने तपास सुरु असताना शहापूर पोलिस ठाण्याकडील पोलिस कॉन्स्टेबल सतिश कुंभार यांना कोरोची गावच्या हद्दीत एक व्यक्ती मेफेड्रॉन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळली.

त्यानुसार शहापूर पोलिसांनी पंचगंगा कारखाना ते कोरोची या मार्गावर सापळा रचला. मिळालेल्या माहितीवरुन ऋषभ खरात याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६ लाख ७३ हजार रुपयांचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करत १३४ ग्रॅम वजनाचा चॉकलेटी, फिक्कट गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगातील मेफेड्रॉन अंमली पदार्थ, सॅक, प्लास्टिकचा बॉक्स, वजन काटा व अन्य साहित्य असा ६ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई शहापूरचे पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी, पोलिस उपनिरिक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली.