शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शहा यांच्या सभेमुळे तपोवन मैदानाला सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 16:18 IST

विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उद्या, रविवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे सभा होत आहेत.

ठळक मुद्देशहा यांच्या सभेमुळे तपोवन मैदानाला सुरक्षा कवचउद्या सकाळी सभा : मुख्यमंत्री आदित्यनाथही येणार

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उद्या, रविवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे सभा होत आहेत.

कोल्हापुरातील सभा सकाळी १० वाजता तपोवन मैदानावर होत असल्याने शुक्रवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाहणी करून बंदोबस्ताची आखणी केली. मैदानाला सुरक्षा कवच राहणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून या मैदानाची रोज बॉम्बशोध पथकासह गुप्तहेर विभागाकडून तपासणी केली जात आहे.शहा हे विमानतळावर उतरून सभेसाठी ते थेट तपोवन मैदानाकडे रवाना होतील. त्यानुसार विमानतळ ते तपोवन मैदान मार्गाची पाहणी पोलिस अधिकाऱ्यांसह निवडणूक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी करून आखणी केली. रविवारी सकाळपासून तपोवन मैदानाच्या परिसराला पोलिसांचे सुरक्षा कवच असणार आहे.

सभेला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. या सभेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. ओबी व्हॅनद्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सभास्थळावरील नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. बॉम्बशोध पथक, श्वानपथक, राज्यराखीव दल यांच्यासह दोन हजार पोलीस तैनात असणार आहेत.हॉटेलची झाडाझडतीशहर व उपनगरांसह राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, लॉजची पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. या ठिकाणी उतरलेल्या लोकांची माहिती रजिस्टर केली जात आहे. आज, शनिवारी रात्री नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेशही जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथkolhapurकोल्हापूर