शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ‘माळीण’ गावांचा शोध सुरू

By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST

धोकादायक गावे : ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे

पाटण : पुणे जिल्ह्यातील ‘माळीण’ गावातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही ‘माळीण’सारखी कैक गावं डोंगर छाताडावर घेऊन जगत असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाकडून आता धोकादायक गावांची माहिती माहिती फोनवरून घेण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष गावांत जाऊन ग्रामस्थांच्या अडचणींची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.पाटण तालुक्यातील निम्मी गावे डोंगरकड्यांच्या आडोशाला वसली आहेत. पावसाळ्यात त्यांच्यावर कड्याची टांगती तलवार असते. डोंगरकडेला असणारी गावे शोधून त्यांना धोका आहे का, याची शोधमोहीम तलाठ्यांमार्फत राबविली जाणार आहे. आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी डोंगरच्या आडोशाला असणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्याची मागणीही केली आहे. परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील काळोशी गाव गायदार कड्याच्या खाली वसले आहे. हा कडा सध्या धोकायदायक स्थितीत आहे. पोलीस प्रशासनाने गुरुवारी काळोशी गावाला भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी दुपारी एक वाजता पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळोशी गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून लवकरच याबाबत ग्रामसभा बोलावून धोकादायक कडा हटविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)आमचं बी गाव डोंगराखाली हाय!‘लोकमत’ने पाटण तालुक्यातील धोकायदायक गावांची सचित्र माहिती प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधून ‘अहो, आमचं बी गाव डोंगराखाली हाय, शासन लक्ष कधी देणार? तेवढी आमच्या गावाची बातमी लावा,’ अशी मागणी केली.तालुक्यातील विठ्ठलवाडी, झिमनवाडी, सुपुगडेवाडी, बोर्गेवाडी, म्हारवंड ही गावे चर्चेत आहेत. या गावांचा सर्व्हे पूर्वीच केला आहे. अशी तालुक्यात बरीच गावे आहेत. काही गावांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत. - किशोर पवार, प्रांताधिकारी, पाटण