शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 13:51 IST

Accident Kolhapur : पोहायला गेलेल्या परखंदळे ( ता.पन्हाळा ) येथील प्रसाद गणपती देसाई ( वय - १६) या शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार ( दि. २२) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गोठे पुलाजवळ घडली. या घटनेमुळे परखंदळे पंचक्रोशीसह कळे विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यूपरखंदळे (ता.पन्हाळा ) येथील घटना, पंचक्रोशीसह कळे विभागात हळहळ

कळे /कोल्हापूर : पोहायला गेलेल्या परखंदळे ( ता.पन्हाळा ) येथील प्रसाद गणपती देसाई ( वय - १६) या शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार ( दि. २२) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गोठे पुलाजवळ घडली. या घटनेमुळे परखंदळे पंचक्रोशीसह कळे विभागात हळहळ व्यक्त होत आहे.इ. १० वीच्या वर्गात शिकत असणारा प्रसाद हा गेले काही दिवसापासुन कुंभी नदी पात्रात पोहायला जात होता. त्याला आजून नीटसं पोहता येत नव्हतं. आज सकाळी मित्रांसोबत तो नेहमीप्रमाणे पोहायला गेला. पण पाण्यात गेल्यानंतर त्याला अंदाज आला नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याचे मित्रपण दुर असल्याने त्याला बुडताना वाचवू शकले नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.याबाबतची फिर्याद प्रसादचे नातेवाईक जगदीश दगडू पाटील यांनी कळे पोलिसांत दिली. घटनास्थळी कळे पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. दुपारी एकच्या सुमारास त्याच्यावर परखंदळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.कुटूबियांचा आक्रोश घटनास्थळी प्रसादच्या आई-वडील, बहिणी व कुटुंबीयांनी फोडलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची प्रसादचे वडील रोजंदारी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवतात. एकुलता एक मुलगा प्रसाद याच्यासह दोन मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. प्रसादच्या जाण्यामुळे देसाई कुटुंबावर नियतीने फार मोठा घाला घातला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातriverनदीDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर