शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समीरच्या ब्रेन मॅपिंगचा निर्णय शुक्रवारी

By admin | Updated: October 7, 2015 00:33 IST

१२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीचा अंतिम निर्णय शुक्रवारी दिला जाईल, असे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी मंगळवारी सांगितले. गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयात हजर करून ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी संमती आहे किंवा नाही, अशी विचारणा केली जाईल. तो न्यायमूर्तींसमोर येऊन काय सांगतो, त्यावर पुढील दिशा ठरणार आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपासकामात गायकवाड सहकार्य करत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सादर केला होता. त्यावर तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी, या गुन्ह्णाच्या पुढील तपासासाठी शास्त्रीय पद्धती वापरणे गरजेचे आहे. ही संधी मिळाली पाहिजे. यामध्ये आरोपीला कोणतीही इजा होत नाही; त्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग चाचणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती तर आरोपीचे वकील अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या सेल्वी अ‍ॅन्ड आदर्स, स्टेट आॅफ कर्नाटक, दि. ५ मे २०१० च्या निर्णयाप्रमाणे आरोपी हा चाचणी करून घेण्यास इच्छुक आहे का? तसेच चाचणी करून घेण्यास त्याची संमती आहे का? या गोष्टी न्यायमूर्तींनी विचारात घ्याव्यात. त्यानंतर ब्रेन मॅपिंगची परवानगी द्यावी, असे म्हणणे मांडले होते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायमूर्ती डांगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संशयित आरोपीला ब्रेन मॅपिंग चाचणी करून घ्यावयाची आहे की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ९) दुपारी समीर गायकवाड यास न्यायालयात हजर करावे, तसे पत्र कारागृह अधीक्षकांना देण्यात यावे, अशा सूचना पोलिसांना केल्या. त्यानुसार शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कोठडी व बे्रन मॅपिंग या दोन्ही निर्णयांंकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी न्यायालयात मेघा पानसरे यांच्यासह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)