आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या वतीने बेघरांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:46+5:302021-07-10T04:17:46+5:30

उचगाव : गोरगरीब, गरजू लोकांसाठी हाजी आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य करणार असल्याचे मत युवा नेते ...

R. S. Helping the homeless on behalf of Maner Social Foundation | आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या वतीने बेघरांना मदत

आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या वतीने बेघरांना मदत

उचगाव : गोरगरीब, गरजू लोकांसाठी हाजी आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य करणार असल्याचे मत युवा नेते तलहा मणेर यांनी व्यक्त केले.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील एकटी संस्था संचलित शाहू बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ व्यक्तींना हाजी आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, फळे वाटप करण्यात आली. पै. खलीलशेठ मणेर यांच्या सामाजिक दातृत्वाच्या भूमिकेतून त्यांचे नातू जैद अरीफ मणेर, तलहा मणेर यांनी सामाजिक बांधीलकी उपक्रमातून कोरोना संकटकाळात मदतीचा हात दिला आहे.

यावेळी युवा नेते तलहा मणेर, प्रतीक कुलकर्णी, सार्थक पाटील, दीपक पुजारी, अक्षय शिंदे, ओमकार राठोड, एकटी संस्थेचे सौरभ पाटील व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

०९ मणेर सोशल फाउंडेशन

फोटो ओळ : हाजी आर. एस. मणेर सोशल फाउंडेशनच्या वतीने शाहू बेघर निवारा येथे जीवनावश्यक वस्तू, फळे वाटप करण्यात आली. कु. जैद अरीफ मणेर, तलहा मणेर, प्रतीक कुलकर्णी, आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: R. S. Helping the homeless on behalf of Maner Social Foundation