शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त व्यक्तीला ‘क्यूआर कोड’द्वारे होणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 05:27 IST

या प्रणालीद्वारे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव, पत्ता, छायाचित्र, रक्तगट ही माहिती आणि त्याचे कुटुंबीय, तातडीच्या संपर्कातील व्यक्तींची नावे, त्यांचे मोबाइल क्रमांक एका स्कॅनवर उपलब्ध होतील

संतोष मिठारी

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीचा अपघात घडल्यानंतर त्याचे नाव, गाव आदी माहिती अथवा त्याच्याजवळच्या व्यक्तींशी संपर्क झाल्यास त्याला मदत करणे अधिक सोपे होते. पण, ही माहिती अनेकदा मिळत नाही. ती अडचण लक्षात घेऊन बोरगाव (ता. पन्हाळा) येथील विनायक गायकवाड या युवकाने क्यूआर कोडच्या मदतीने डिजिटल इर्न्फोमेशन कार्ड (डीआयसी) ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. या कार्डद्वारे अपघातग्रस्त व्यक्तीची प्राथमिक माहिती मिळविण्यासह त्याच्या तातडीच्या संपर्कातील लोकांशी संपर्क साधता येणे शक्य झाले आहे. आता या प्रणालीच्या पेटंटसाठी त्याने अर्ज केला आहे.

या प्रणालीद्वारे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव, पत्ता, छायाचित्र, रक्तगट ही माहिती आणि त्याचे कुटुंबीय, तातडीच्या संपर्कातील व्यक्तींची नावे, त्यांचे मोबाइल क्रमांक एका स्कॅनवर उपलब्ध होतील. अपघातग्रस्त व्यक्तीच्या वैयक्तिक आणि वाहन विम्याची माहिती मिळवून त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करता येईल. या प्रणालीमध्ये प्रत्येक व्यक्तीला क्यूआर कोड देऊन तो एका विशिष्ट ३७ अंकी खात्याशी जोडला जातो. मोबाइल क्रमांक समाविष्ट करून ओटीपी व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर डीआयसी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, आदी संपूर्ण माहिती भरून डीआयसी तयार केली जाते. डीआयसी कार्डमध्ये वाहन परवाना, पीयूसी, आरसी बुक आदी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवता येतात. ही कोणत्या क्षणी स्मार्टफोनवर उपलब्ध करून घेता येतात.  
मेकॅनिकल पदविका शिक्षणाचा वापर करून ही संकल्पना जानेवारीमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. किचेनच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या डीआयसी कार्डसाठीचा खर्च अत्यंत कमी आहे. विकसित केलेल्या या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज केला असल्याचे विनायक गायकवाड यांनी सांगितले.

डीआयसी स्कॅन करताच संदेश
ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने डीआयसी तपासल्यास त्याचा संदेश डीआयसी कार्डधारक आणि त्याच्या तातडीच्या संपर्कातील व्यक्तींना जातो. अपघात झाल्यानंतर कुणी डीआयसी तपासल्यास त्याचीदेखील माहिती या पद्धतीने शेअर होते.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर