शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरी पतसंस्थेचे वाटचाल अभिमानास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:42 IST

प्रयाग चिखली : जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि सहकार यांचा काडीमात्र संबंध नसताना प्रतिकूल परिस्थितीत वरणगे पाडळी येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख ...

प्रयाग चिखली : जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि सहकार यांचा काडीमात्र संबंध नसताना प्रतिकूल परिस्थितीत वरणगे पाडळी येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी आंग्रे यांच्या शिवनेरी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल ही शिवसेनेसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद‌्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काढले. वरणगे येथील शिवनेरी पतसंस्थेच्या नूतन वास्तुप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सहकारासमोर असणाऱ्या अडचणीवर मात करीत यशस्वीपणे वाटचाल केल्याबद्दल शिवनेरी पतसंस्थेचे कौतुक केले. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, तानाजी आंग्रे, चेअरमन राजाराम वनारे, दत्ता कनोजे, कृष्णात धनवडे, विश्वजित कनोजे, धनाजी बिरंजे, आनंदराव पवळ, नामदेव पाटील, विलास पाटील, शिवाजी कुडाळकर, आकाराम आंबेकर, रणजित पवार, शहाजी पाटील, ॲड. संजय नलगे उपस्थित होते.

चौकट :

ज्या इमारतीत शिवनेरी पतसंस्था स्थलांतरित करण्यात आली आहे, ती इमारत बाधित आहे, असा समज पसरला होता. त्यामुळे गेली पंचवीस वर्षे ती इमारत बंद होती. ती खरेदी करण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. मात्र, तानाजी आंग्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ती इमारत खरेदी करून अंधश्रद्धेला मूठमाती दिली आहे.