शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई फार्सच !

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

साखर कारखानदारीतून तीव्र संताप : नदी प्रदूषणाचे नियम पाळण्याबाबत अनास्था दाखविणारे अन्य घटकांवर कारवाईच नाही

प्रकाश पाटील - कोपार्डे -नदी व तत्सम स्रोतांचे प्रदूषण केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांवर त्यांनी नदीतील प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी केलेल्या सर्व उपाय योजनेनंतरही कारवाई केली गेली, ही केवळ साखर कारखान्यांनी दिलेल्या बँकहमीच्या रकमेवर डोळा ठेवून व नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य अस्थापनेला वाचविण्यासाठी केलेली खेळी असल्याच्या प्रतिक्रिया साखर कारखानदारीतून व्यक्त होत आहेत.गेल्या काही वर्षांपासून नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने अनेक गावात गॅस्ट्रो, कॉलरा सारख्या साथीच्या रोगांची लागण होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र यातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकापर्यंत प्रदूषण मंडळ न पोहोचता ज्याच्यावर सहज कारवाई करता येईल अशा उद्योगांना वेठीला धरून आपल्यावरील जबाबदारी झटकत असल्याचे बोलले जात आहे.सध्या साखर कारखान्यांचे हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये वापर होणाऱ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो. यामुळेच प्रदूषण झाल्याचा दावा प्रदूषण मंडळाने केला असला तरी या दहापैकी केवळ ‘दत्त दालमिया आसुर्ले-पोर्ले या कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीला मिळाल्याची नोंद प्रमुख विभागाकडे २०१३-१४ च्या हंगामातील आहे. इतर नऊ कारखान्यांच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या सर्व नियम व अटींची पूर्तता केल्याची व पाणी वापरानंतर ते शेती सिंचनासाठी वापरले जात आहे. याचे दाखले वेळोवेळी दिले आहेत. मात्र, नदी प्रदूषणाबाबत सध्या जनतेच्या रोषाला या विभागाचे अधिकारी बळी पडत आहेत. जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी हा खटाटोप असून कारखान्यांचे पैसे बँक हमीद्वारे हातात असल्याने सहज कारवाईला मूर्त स्वरुप देता येत असल्यानेच साखर कारखान्यांवरील कारवाई केली जात असल्याचे मत साखर उद्योगातील जबाबदार व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.मुळात भोगावतीचे पाणी नदीपर्यंत पोहोचतच नाही. साखर उद्योग हा माणसांचा विशेषत: ग्रामीण जनतेला जगवणारा उद्योग आहे. प्रदूषण मंडळाचे सर्व नियम व अटी पाळण्यासाठी सर्व कारखानदार आटोकाट प्रयत्न करतात, पण कारवाई कोणत्या निकषावर होते हे प्रदूषण मंडळालाच माहीत आहे. - धैर्यशील पाटील, अध्यक्ष, भोगावती कारखानाकुंभीचे पाणी प्रदूषण रोखणारे प्रदूषण मंडळाचे सर्व प्रकल्प उभा केले आहेत. प्रदूषण मंडळाने कुंभी-कासारीचे पाणी नदीत मिसळून प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. बऱ्याच वेळा त्याबाबत तपासण्याही या विभागाकडून झाल्या आहेत. मात्र तरीही बँक हमी जप्तीची कारवाई न समजण्यासारखी आहे. - अरुण जाधव, पर्यावरण इंजिनियरमहानगरपालिकेचे दररोज ७५ दशलक्ष घन मीटर सांडपाणी जयंती नाल्याद्वारे सरळ नदीत मिसळत आहे. या पाण्याच्या ५० टक्के पाण्यावरही प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया केली जात नाही. हे पाणी सरळ नदीत मिसळत असताना प्रदूषण मंडळाचे लक्ष कोठे आहे? एवढेच नाही तर नदीकाठच्या गावांचे लाखो लिटर पाणी या गावाकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सरळ नदीत मिसळत असल्याचे प्रदूषण मंडळाकडे नोंदी असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.