कवी ना. वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:34+5:302021-08-27T04:27:34+5:30

कवी देशपांडे यांनी त्यांच्या हयातीत कविता, गीतांसोबतच अनेक नामवंत शाहिरांसाठी लेखन केले. त्यांचे दोन वर्षांपूर्वी वयाच्या ८६व्या वर्षी निधन ...

Poet no. Or. Deshpande's bibliography handed over to Shivaji University | कवी ना. वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द

कवी ना. वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द

कवी देशपांडे यांनी त्यांच्या हयातीत कविता, गीतांसोबतच अनेक नामवंत शाहिरांसाठी लेखन केले. त्यांचे दोन वर्षांपूर्वी वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याकडे महाभारत, भगवद्गीता, त्यांवरील भाष्ये, संतसाहित्य यांसह अनेकविध प्रकारची दुर्मीळ ग्रंथसंपदा होती. त्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. आपल्या माघारी ही ग्रंथसंपदा चांगल्या ठिकाणी जावी आणि भावी पिढ्यांच्या उपयोगी पडावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या माघारी पत्नी सुनंदा यांनी त्यांच्या ग्रंथसंपदेचा जिव्हाळ्याने सांभाळ केला. विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयास देणगी स्वरूपात एकूण ४५६ ग्रंथ सुपूर्द केले. प्रा. शशिकांत चौधरी यांचे या प्रक्रियेसाठी सहकार्य लाभले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

चौकट

कवी देशपांडे यांच्याविषयी थोडक्यात

कवी देशपांडे हे कोल्हापुरातील अनेक शाहिरांचे लाडके कवी होते. त्यांच्या अनेक रचना संगीतकार दिनकरराव पोवार यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. शीघ्रकवी लहरी हैदर, ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांच्याशी त्यांचा मोठा स्नेह होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

फोटो (२६०८२०२१-कोल-कवी देशपांडे ग्रंथसंपदा) : कोल्हापुरात बुधवारी दिवंगत कवी ना. वा. देशपांडे यांचा ग्रंथसंग्रह शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याबाबतचे पत्र उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांना सुनंदा देशपांडे यांनी दिले.

फोटो (२६०८२०२१-कोल-कवी देशपांडे)

260821\26kol_16_26082021_5.jpg~260821\26kol_17_26082021_5.jpg

फोटो (२६०८२०२१-कोल-कवी देशपांडे ग्रंथसंपदा) : कोल्हापुरात बुधवारी दिवंगत कवी ना. वा. देशपांडे यांचा ग्रंथसंग्रह शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याबाबतचे पत्र उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांना  सुनंदा देशपांडे यांनी दिले.फोटो (२६०८२०२१-कोल-कवी देशपांडे)~फोटो (२६०८२०२१-कोल-कवी देशपांडे ग्रंथसंपदा) : कोल्हापुरात बुधवारी दिवंगत कवी ना. वा. देशपांडे यांचा ग्रंथसंग्रह शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याबाबतचे पत्र उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांना  सुनंदा देशपांडे यांनी दिले.फोटो (२६०८२०२१-कोल-कवी देशपांडे)

Web Title: Poet no. Or. Deshpande's bibliography handed over to Shivaji University