शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

(नियोजन विषय)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

तानाजी पोवार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोविड कालावधीत संचारबंदीचे उल्लंघन केलेले गुन्हे काढून घेण्याबाबत गृहमंत्रालय पातळीवर सूचना दिल्या ...

तानाजी पोवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोविड कालावधीत संचारबंदीचे उल्लंघन केलेले गुन्हे काढून घेण्याबाबत गृहमंत्रालय पातळीवर सूचना दिल्या आहेत. तसा अध्यादेश अद्याप कोल्हापूर पोलीस दलापर्यंत पोहोचलेला नाही. तसे झाल्यास कोविड कालावधीत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले संचारबंदी उल्लंघनाचे सुमारे २२३९ गुन्हे रद्द होणार आहेत. खरे कोविड योध्दे म्हणून जिवाची बाजी लावून काम करणारे पोलीस व आरोग्य विभागातील डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांवरील हल्ले वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना महामारीत मार्चअखेरपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, तसेच आरोग्य प्रशासन यांनी संयुक्तपणे परिश्रम घेतल्याने कोरोनाला पळवून लावले. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत पुकारलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भा.द. स. कलम १८८ अंतर्गत गुन्हे नोंदवले. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाप्रत शासन आले आहे.

पोलीस, डॉक्टरांवरील हल्ल्यांचे गुन्हे ‘जैसे थे

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात पोलिसांवर हल्ल्यांच्या १८ घटना घडल्या, तर आठ पोलीस जखमी झाले, हल्लाप्रकरणी ८५ जणांना अटक केली. याशिवाय डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात ४, भुदरगड पोलीस ठाण्यात २, तर शाहुवाडी, करवीर व पन्हाळा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला. हे हल्ल्याचे गुन्हे जैसे थे ठेवून इतर उल्लंघनाचे गुन्हे रद्द करण्याची शक्यता आहे.

गुन्हे काढून घेण्याची प्रक्रिया

शासनाने गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच शासकीय अधिकाऱ्यांची कमिटी नेमली जाते. त्यामध्ये गुन्ह्याची गांभीर्यता पाहून कोणते गुन्हे मागे घ्यायचे हे ठरते.

कोरोना कालावधीत विविध दाखल गुन्हे

- संचारबंदी आदेशाचे उल्लंघन : २२३९ गुन्हे

- विनापरवाना वाहन प्रवास : १२८

- क्वारंटाईन नियम उल्लंघन : १७३ गुन्हे (कारवाई : २४०)

- अफवा पसरवणे : ५२

- जादा वेळ दुकान, हॉटेल सुरू ठेवणे : १६२४

- पोलिसांवरील हल्ले : ८५ जणांना अटक (घटना : १८, जखमी पोलीस : ८)

इतर पॉईंटर....

- एकूण अटक : २८५

- वाहने जप्त : ९०११ (काही कालावधीपुरती)

- वाहनांवर गुन्हे : ४८३४

- दंड वसूल : २ कोटी ७० लाख ८७ हजार रुपये

कोट...

शासन कोविड कालावधीतील संचारबंदी उल्लंघनाचे गुन्हे मागे घेण्याबाबत विचारविनिमय करत आहे, तसा निर्णयाचा अध्यादेश कोल्हापूर पोलीस दलास मिळाल्यास पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे.

- शशिराज पाटोळे , पोलीस निरीक्षक, जि. वि. शा.