आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 05:08 PM2021-07-10T17:08:48+5:302021-07-10T17:11:34+5:30

CoronaVirus In Kolhapur : कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला असून यामध्ये गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

Planning by the administration for setting up of oxygen generation plant as required | आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन

आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन

Next
ठळक मुद्देआवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजनजिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला असून यामध्ये गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आवश्यकतेनुसार ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीबाबत प्रशासनाने नियोजन केले आहे. कोडोली, आयजीएम येथील रिफलिंग आमदार निधीतून तर गडहिंग्लज आणि सीपीआरचे रिफलिंग हे डीपीडीसीतून करण्यात यावे.

त्याच बरोबर जलसंपदा (यांत्रिकी)चे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी एकत्रित बसून ऑक्सीजन प्लाँन्टसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेला जो निधी आहे तो निधी कसा वापरायचा याचे नियोजन करावे, अशी सूचनाही पाटील यांनी केली.

ऑक्सीजन जनरेशन प्लाँट उभारणीच्या अनुषंगाने एमएससीबीचा, शेड उभारणी, जनरेटर त्याचबरोबर प्लाँट उभारणीबाबतचा विस्तृत आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Planning by the administration for setting up of oxygen generation plant as required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.