शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीएम’चा नादच खुळा!

By admin | Updated: September 2, 2015 00:01 IST

डॉल्बी हद्दपारसाठी पुढाकार : कोल्हापुरात पहिला डॉल्बी आणणारे मंडळ

कोल्हापूर : कोल्हापुरातील पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम)ची ओळख नामांकित फुटबॉल संघासोबत दरवर्षी अनंत चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतील एक महत्त्वाचे मंडळ म्हणून आहे. मात्र, डॉल्बीमुळे होणारे दुष्पपरिणाम लक्षात घेता मंडळाने यंदापासून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन विधायकतेचे पाऊल टाकले. निर्माल्य दान, मूर्तीदान नंतर कोल्हापूरचा गणेशोत्सव आता डॉल्बीमुक्तीच्या दिशेने निघाला आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव मिरवणुकीत पाटाकडील तालीम मंडळाच्यावतीने प्रथम डॉल्बी आणला होता. यासह विमानातून मिरवणुकीत मंडळाच्या गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी, नाशिक ढोल पथक अशा आकर्षणामुळे ‘पीटीएम’ची विसर्जन मिरवणूक वेगळे आकर्षण ठरते. यंदा मात्र डॉल्बीला फाटा देत फक्त पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्याचा निर्णय गणेशोत्सव समितीने घेतला आहे. डॉल्बीचा खर्च विधायक उपक्रमांसाठी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.असे आहेत पदाधिकारी मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाचे एस. वाय. सरनाईक अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आहेत. यासह रावसाहेब सरनाईक, पी. जी. पाटील, पांडबा जाधव, संभाजी मांगुरे-पाटील, संदीप सरनाईक, राजू पाटील, संपत जाधव यांच्यासह मंडळातील ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतात. यंदाची गणेशोत्सव कमिटीच्या उपाध्यक्षपदी कमलेश शिंदे, सेक्रेटरी सचिन कोळी, उपसेक्रेटरी संतोष शिंदे, खजानिस धनंजय विचारे हे काम पाहत आहेत. कोल्हापुरात प्रथम आमच्या मंडळाने मिरवणुकीत डॉल्बी आणला होता. डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम व यावर खर्च होणारे पैसे या गोष्टींचा विचार करून उत्सव समितीने यंदा डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉल्बीसाठी होणारा खर्च आम्ही विधायक कामांसाठी वापरणार आहे. - कपिल हवालदार,अध्यक्ष, पीटीएम गणेशोत्सव समिती