शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

जमीन कसते तिसरी पिढी.. सातबारा आजोबांच्या नावे; नोंदणी शुल्क माफीचा शेतकऱ्यांना फायदा होणार

By भीमगोंड देसाई | Updated: May 29, 2025 19:16 IST

शेत वाटणीची एक टक्का दस्त नोंदणी शुल्क वाचणार

भिमगोंड देसाई

कोल्हापूर : शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. यामुळे दुय्यम निबंधकांकडे वाटणीच्या नोंदणीसाठी मूल्यांकनाचा एक टक्का शेतकऱ्यांचा वाचणार आहे. मात्र यापेक्षा सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया महसूल प्रशासनाकडे यापूर्वीच मोफत आहे. त्यामुळे शासनाच्या या नवीन निर्णयाचा फायदा केवळ दुय्यम निबंधकांकडे वाटणीपत्र नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. हे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे, असे मुद्रांक प्रशासनाचे म्हणणे आहे.

रक्ताच्या नात्यातील भाऊ, बहिणी संमतीने शेतजमीन वाटणी करून घेतात. त्याची नोंदणी दुय्यम निबंधकांकडे गेली तर त्या जमिनीच्या रेडीरेकनर मूल्यांकनाच्या एक टक्का रक्कम किंवा अधिकाधिक ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरावी लागत होती. आता शासनाने नोंदणी शुल्क माफ केल्याने ही रक्कम भरावी लागणार नाही.

पण यापेक्षा शेतकरी पूर्वीपासूनच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ नुसार तहसीलदार यांच्यासमोर मोफत वाटणीपत्राची तरतूद आहे. ही प्रक्रिया दुय्यम निबंधकांपेक्षा सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे सर्व भाऊ, बहीण यांची संमती असेल तर तहसीलदार यांच्यासमोरच वाटणीपत्र करून घेतो. वाद असल्यास न्यायालयात वाटणीपत्र दाखल होते. तेथे लागलेल्या निकालपत्रानुसार किंवा तडजोड नामानुसार मालमत्तेची वाटणी होते.

शेतकऱ्यांसाठी निर्णय चांगला मात्र लाभ कमी

भाऊ, बहिणीमध्ये संमतीने वाटणीपत्र करून त्याची दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करणाऱ्यांसाठी नवीन निर्णय चांगला आहे. पण अशा पद्धतीने नोंदणी करण्याकडे कल कमी असल्याने याचा लाभ कमी शेतकऱ्यांना होणार आहे, असे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे.

दलालांमधून सुटका कधी ?

दुय्यम निबंधकांकडील शुल्क माफ झाले आहे. पण येथे नोंदणीसाठी सक्रिय असलेल्या दलालांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची कधी सुटका होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीGovernmentसरकार