लहान मुलांसाठी आता स्वतंत्र कोविड उपचार केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:31+5:302021-05-23T04:24:31+5:30

कोल्हापूर : कोरोनाची लागण लहान मुलांनाही होत आहे. लहान मुलांमधील हा संभाव्य धोका जाणून महापालिकेतर्फे शहरात लहान मुलांसाठी स्वतंत्र ...

Now a separate covid treatment center for young children | लहान मुलांसाठी आता स्वतंत्र कोविड उपचार केंद्र

लहान मुलांसाठी आता स्वतंत्र कोविड उपचार केंद्र

कोल्हापूर : कोरोनाची लागण लहान मुलांनाही होत आहे. लहान मुलांमधील हा संभाव्य धोका जाणून महापालिकेतर्फे शहरात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड उपचार केंद्र करण्यात येणार आहे. याची जोरदार तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित मुलांवर वेळेत उपचार होण्यासाठी लहान मुलांचे कोविड उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रात उपचारासाठी तज्ज्ञांची गरज आहे. यासाठी महापालिकेकडील ६ मेडिकल ऑफिसर व १२ नर्सेसना डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. निवेदिता पाटील, डॉ. प्रीती नाईक, डॉ. रवींद्र पवार, डॉ. देव्यानी कुलकर्णी यांनी प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणात मध्यम व सौम्य लक्षणे असणाऱ्या मुलांवर करण्यात येणारे उपचार, गंभीर आजारी लहान मुलांना संदर्भ सेवा देणे, धोक्याची लक्षणे कशी ओळखावी, लहान मुलांसाठी कोणती विशेष काळजी घ्यावी या विषयांवर यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Now a separate covid treatment center for young children