शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नाही, तर मतदान नाही; कोल्हापुरातील 'या' गावाने दिला निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:30 IST

एकजुटीचा निर्धार

गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामुळे तामगावला जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केल्याने तामगाव (ता. करवीर) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर शनिवारी रात्री हनुमान मंदिरात झालेल्या ग्रामसभेत, जोपर्यंत रस्त्याचा ठोस प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

विमानतळ प्रशासनाने पर्यायी रस्त्याची सोय न करताच जुन्या रस्त्यावर भिंत बांधून तो बंद केला आहे. प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत ‘हुकूमशाही’ पद्धतीचा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्ता बंद झाल्यामुळे शाळकरी मुले, नोकरीला जाणारे तरुण आणि वृद्ध नागरिकांना आता तब्बल ८ ते ९ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यावेळी महेश पिंपळे, हेमंत पाटील, राजेंद्र पावंडे, माणिक जोंधळेकर, विश्वास तरटे, विक्रम ढाले, कृष्णात जोंधळेकर, तानाजी सासणे, श्रीधर गवते, अनिल पाटील, सुभाष सुतार, अभिजीत मोहोळकर, सुंदर कांबळेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकजुटीचा निर्धार

निवडणुकीच्या काळात प्रशासनावर दबाव टाकण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत, 'रस्ता नाही, तर मतदान नाही' असा पवित्रा संपूर्ण गावाने घेतला आहे. जोपर्यंत पर्यायी किंवा कायमस्वरूपी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत कोणीही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांच्या या पवित्र्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No Road, No Vote: Kolhapur Village Threatens Election Boycott

Web Summary : Tamgaon villagers boycott upcoming elections due to airport road closure. They demand an alternative route, citing hardship for students and workers. Frustrated by administrative inaction, residents resolved 'No road, no vote' until a solution is found.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Votingमतदान