शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समितीत राष्ट्रवादीचा झेंडा, सर्वाधिक चार ठिकाणी सभापती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:36 IST

कोरे, यड्रावकर यांना एक सभापतिपद

कोल्हापूर : सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्यांचा मानकरी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना १२ पैकी ४ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांवर विराजमान होण्याची संधी मिळाली. भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन पंचायत समित्यांमध्ये सभापती झाले असून, शाहूवाडी आणि शिरोळच्या सभापतिपदी अनुक्रमे जनसुराज्य आणि शाहू आघाडीचे सभापती बनले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका ७ फेब्रुवारीला झाल्या आणि ९ फेब्रुवारीला निकाल लागला. त्यानंतर मंगळवारी बाराही तालुक्यांच्या ठिकाणी या सभापती निवडी पार पडल्या. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

आजरा, गडहिंग्लज, करवीर आणि चंदगड या चार पंचायत समित्यांची सभापतिपदे राष्ट्रवादीकडे आली आहेत. करवीरच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील (कुरूकली) यांची, तर उपसभापतिपदी भाजपच्या दीपाली पाटील (पाचगाव) यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाचा भाजपला सत्तेत येण्याची संधी मिळाली.

चंदगडच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे विलास नाईक आणि उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्याच संज्योती मळवीकर यांची बिनविरोध निवड झाली. गडहिंग्लजच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या डॉ. प्रतिभा चव्हाण आणि उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे अमर हिडदुगी यांची निवड झाली. आजऱ्याच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या जयश्री गाडे (भादवण) यांची, तर उपसभापतिपदी उद्धवसेनेच्या यशोदा पोवार यांची बिनविरोध निवड झाली.

कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या सुवर्णा पाटील यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या इंद्रजित पाटील यांची निवड झाली. हातकणंगलेच्या सभापतिपदी भाजपच्या अश्विनी बिरंजे (पट्टणकोडोली) आणि उपसभापतिपदी शिंदेसेनेचे रघुनाथ कांबळे (आळते) यांची बिनविरोध निवड झाली.

राधानगरीच्या सभापतिपदी काँग्रेसचे आर. वाय. पाटील (सोळांकूर) आणि उपसभापतिपदी काँग्रेसच्याच अश्विनी चंद्रकांत चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. गगनबावड्याच्या सभापतिपदी काँग्रेसच्या छाया प्रकाश देसाई (असंडोली) यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचेच राजेश भगवान पाटील (सांगशी) यांची निवड झाली.

पन्हाळ्याच्या सभापतिपदी शिंदसेनेचे रवींद्र पाटील यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या भारती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भुदरगडच्या सभापतिपदी शिंदसेनेचे विक्रमसिंह पाटील आणि उपसभापतिपदी शिंदेसेनेच्याच अरुणा देसाई यांची निवड झाली.

शाहूवाडीच्या सभापतिपदी चिठ्ठीवर जनसुराज्यच्या प्रियांका तानाजी भोसले यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचे अमरसिंह खोत यांची निवड झाली. तर शिरोळमध्ये यड्रावकर यांच्या शाहू आघाडीचे मिलिंद कुरणे (अब्दुललाट) आणि शाहू आघाडीच्याच मनीषा कदम (शिरदवाड) यांची उपसभापतिपदी निवड झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Nationalist Congress Party Dominates Panchayat Samitis in Kolhapur District

Web Summary : In Kolhapur, the Nationalist Congress Party secured chairmanship in four Panchayat Samitis. BJP, Shiv Sena (Shinde), and Congress each won two. Janasurajya and Shahu Aghadi secured one each in Shahuwadi and Shirol respectively after elections held in February.