शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 2:47 PM

Muncipal Corporation , kolhapur, elecation कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने सर्व माहिती संकलित करून तयार ठेवली आहे. यामध्ये गेल्या तीन निवडणुकांतील आरक्षणाच्या माहितीचा समावेश आहे. पुढील प्रक्रियेसाठी प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देमहापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाकडे नजराप्रशासनाकडून गेल्या तीन निवडणुकांच्या आरक्षणाची माहिती संकलित

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने सर्व माहिती संकलित करून तयार ठेवली आहे. यामध्ये गेल्या तीन निवडणुकांतील आरक्षणाच्या माहितीचा समावेश आहे. पुढील प्रक्रियेसाठी प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे.कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलली जाणार यात शंका नाही. मात्र निवडणुकीच्या पूर्वीची कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने दीड महिन्यापूर्वी महापालिकेच्या प्रशासनाला दिले आहे.

त्यानुसार आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार माहिती तयार करण्याचे आदेश दिले. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घरफाळा अधीक्षक विजय वणकुद्रे, सुरेश शिंदे, सचिन देवाडकर यांनी आतापर्यंत दिलेले सर्व कामकाज पूर्ण केले आहे.गेल्या तीन निवडणुकांचा अभ्यासमहापालिकेच्या २००५, २०१० आणि २०१५ या निवडणुकांमध्ये किती प्रभाग होते, आरक्षण काय होते, एका प्रभागाची किती लोकसंख्या होती, तसेच २०२० च्या निवडणुकीतील आरक्षण यांची सर्व माहिती प्राथमिक स्वरूपात तयार केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मागणी केल्यानंतर ती पाठवली जाणार आहे.कोरोना आटोक्यात आणण्यास प्रधान्यकोरोनामुळे प्रत्येक अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांची जबाबदारी आहे. तसेच काही अधिकारी आजारी आहेत. अशा स्थितीतही राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रानुसार आत्तापर्यंतची सर्व माहिती तयार ठेवली आहे. सध्या कोरोना आटोक्यात आणणे यालाच प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.प्रशासकाचा कालावधी नेमका कितीमहापालिकेवर १५ नोव्हेंबरनंतर प्रशासक नियुक्त होणार आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडेच सर्व अधिकार असणार आहेत. कोरोनामुळे निवडणूक काही महिने पुढे ढकलण्यात येणार आहे. तसे संकेतही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. कोरोनाचे संकट आणखी किती दिवस राहणार त्यावर सर्व काही अवलंबून आहे. परिणामी नेमके किती दिवस महापालिकेवर प्रशासक राहणार, याचा अंदाज सध्या तरी बांधणे शक्य नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर