शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिक चे कसबा बावडा येथील ‘एसटीपी’ पावसाळ्यात बंद

By admin | Updated: September 11, 2014 00:13 IST

ड्रेनेज लाईन नसल्याचा परिणाम : पावसाळ्यात ६० लाखांची बचत

कोल्हापूर : महापालिक चे कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरू होऊन तीन महिने झाले. यानंतर चाचणी परीक्षणादरम्यान, उच्च न्यायालयास अहवाल देण्यापूर्वी तसेच उद्घाटनापूर्वी एक दिवस असे एकूण तीन दिवसच प्लँट सुरू झाला. शहरातील सांडपाणी उघड्या नाल्यातून वाहत असल्याने पावसाळी पाण्यावरही प्रक्रियेचे जादा पैसे मोजावे लागतात. पावसाळ्यात पाण्याचा ‘बीओडी’स्तरही चांगला असतो. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात प्लँट बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट) सध्या ४८ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेला दोनवेळा बॅँक गॅरंटीच्या जप्तीची नामुष्की पत्करावी लागली आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) ३१ मार्चपर्यंत सुरू करण्याचे निर्देष न्यायालयाने दिले होते. मात्र, ठेकेदाराची आर्थिक अडचण व तांत्रिक बाबींमुळे प्लँट सुरू होण्यास विलंब लागला. जुलै महिन्यात वाजत-गाजत महापालिकेने प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, यानंतरही प्लँट बंदच राहिल्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)पुनर्वापराचे आव्हानप्रक्रिया केलेल्या पाण्याचा बी.ओ.डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक) १० एम.जी. प्रती लिटरपेक्षा कमी असण्याचा दावा महापालिकेने केला. या वर्षाअखेरपर्यंत ७६ एमएलडी पाण्यावर प्रक्रियाची शक्यता आहे. केंद्रातून बाहेर पडणारे हे पाणी किमान शंभर एकर शेतीसह, बागा, बांधकाम आदींसाठी वापरण्याची योजना आहे. या पाण्याच्या पुनर्वापराचे आव्हान आहे.६० लाखांची बचतकोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते. एक एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रूपये खर्च येतो. प्रक्रिया केंद्राची सध्याची क्षमता ४८ एमएलडी आहे.प्रतिदिन ६७ हजार ७२८ रुपये सांडपाण्यावर प्रक्रियाचा खर्च करावे लागतील. पावसाळ्यात केंद्र बंद ठेवल्याने ६० लाख ९५ हजार रुपयांची बचत होते.