शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुजाऱ्यांविरोधात भक्तांचे आंदोलन

By admin | Updated: June 19, 2017 00:51 IST

अंबाबाईला साकडे : गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पाचजणांना रोखले; जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईस घागरा-चोली नेसविण्याचा प्रकार व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान यावरून मंदिरातील पुजाऱ्यांना हटवण्याच्या सर्वपक्षीय आंदोलनास रविवारी प्रारंभ झाला. ‘आई अंबाबाई..तुझा व राजर्षी शाहूराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे घालत शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी आंदोलन केले. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्वाभिमान’च्या सचिन तोडकरसह पाचजणांना पोलिसांनी रोखले. आंदोलकांनी मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंबाबाईला गेल्या शुक्रवारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेले घागरा-चोली नेसविले. या वादाचे पर्यवसान शनिवारी जनप्रक्षोभात झाले. त्यात श्रीपूजकांनी मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड आणि ‘तथाकथित’ भाषेत राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकुमाचाही अवमान केला. याविरोधात आंदोलन म्हणून कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनांमधील भक्त रविवारी सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर एकत्रित आले. यावेळी महिला अग्रभागी होत्या. पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्व भक्तांनी एकत्रितरीत्या मंदिरात जाऊन ‘आई, तुझा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना बाहेर काढ व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी दे,’ असे म्हणत देवीपुढे साकडे घातले. यावेळी भक्तांकडून ‘ उदं गं आई उदं,’ ‘अंबामाता की जय,’ ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं,’ ‘राजर्षी शाहू महाराज की जय,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या दरम्यान परगावाहून आलेल्या भक्तांना पितळी उंबऱ्याच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांना आंदोलन कसे आणि कशासाठी सुरू आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे ते काहीकाळ देवीचे दर्शन मिळत नसल्याने हवालदिल झाले . मात्र, आंदोलनानंतर दर्शन सुरळीत झाल्याने या भाविकांना हायसे वाटले. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ‘साकडे’ आंदोलनानंतर अंबाबाई मंदिर परिसरातील सिद्धिविनायक मंदिराच्या ओवरीवर झालेल्या छोट्याशा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना बुधवारी (दि. २१) रोजी दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय संघटना, भक्त यांच्यातर्फे कारवाईबाबतचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली. --------- साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाला तसा कायदा संमत करावा लागला. श्रीपूजकांच्या पत्नी, आई, मुलींना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे सर्व जातींच्या महिलांना मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी लवकरच जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे. आई अंबाबाईच्या पूजेचा विधी करण्याचा अधिकारही महिलांना मिळावा. - सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार