कोडोली येथे वारणा धरणग्रस्तांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:22+5:302021-02-09T04:27:22+5:30

कोडोली येथे राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेमार्फत वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचा आयोजित मेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ...

Meeting of Warna dam victims at Kodoli | कोडोली येथे वारणा धरणग्रस्तांचा मेळावा

कोडोली येथे वारणा धरणग्रस्तांचा मेळावा

कोडोली येथे राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेमार्फत वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचा आयोजित मेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या दलाल व्यवस्था निर्माण झाली असून, ती मोडीत काढली पाहिजे. सर्वांच्यात लढण्याची शक्ती आहे फक्त त्याला ऊर्जा देणे गरजेचे आहे. लक्ष्मणराव पासलकर म्हणाले, लाभ क्षेत्रातील जमिनी प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्याचा कायदा असूनदेखील सुमारे सहा लाख धरणग्रस्तांचे अद्याप प्रश्न सुटलेले नाहीत. यावेळी गाववार कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भाई भारत पाटील उमेश कांदे, एम. पी. पाटील, सचिन घोलप, रामचंद्र पाटील, सुनील पाटील, बाजीराव पाटील उपस्थित होते.

फोटो ओळ : कोडोली येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणग्रस्त शेतकरी परिषदेमध्ये बोलताना गौरव नायकवडी. लक्ष्मणराव पासलकर भाई भारत पाटील उपस्थित होते.

Web Title: Meeting of Warna dam victims at Kodoli