शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संजय घाटगे यांचा जीव भांड्यात पडला

By admin | Updated: August 22, 2014 00:32 IST

कागल विधानसभा : दुरंगी लढत स्पष्ट

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून ‘महायुतीचे उमेदवार’ म्हणून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीच नावाची घोषणा केल्याने माजी आमदार संजय घाटगे यांचा जीव अखेर भांड्यात पडला. संजय मंडलिक यांनी घाटगे यांच्या उमेदवारीची घोषणा यापूर्वीच केली होती; परंतु मंडलिक यांनी त्याबाबत काहीच स्पष्ट भूमिका न घेतल्याने कागल तालुक्यात तर्क-वितर्कांना उधाण आले होते, त्याची स्पष्टता आज झाली. या मतदारसंघातून जलसंपदामंत्री ‘हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे’ अशी लक्षवेधी लढत होऊ शकते.मुश्रीफ यांचा पराभव केल्याशिवाय मी मरणार नाही, असे मंडलिक वारंवार म्हणत आले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्यही अनिश्चित बनले आहे. ते विजयी झाले असते तर घाटगे यांचा मार्ग तेव्हाच मोकळा झाला असता. त्यामुळे मंडलिक खरेच संजय घाटगे यांना पाठिंबा देणार की पुन्हा संजय मंडलिक यांच्यासाठी आग्रह धरणार याबद्दल संभ्रमावस्था होती. त्यातच मध्यंतरी संजय घाटगे यांनी जनसुराज्यचे नेते विनय कोरे, शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे व युवराज संभाजीराजे यांच्या भेटीगाठी घेतल्याचे मंडलिक यांना आवडलेले नव्हते. घाटगे यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशीही सलोख्याचे संबंध आहेत, याचाही मंडलिक यांना राग होता. संजय घाटगे यांनी आतापर्यंत जनता दल, शिवसेना, स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस अशा विविध पक्षांकडून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ते आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना कितपत विश्वास देतील, अशीही शंका मंडलिक बोलून दाखवित होते. घाटगे यांची उमेदवारी जाहीर करण्याबाबत या कारणांमुळेच विलंब होत होता. जोपर्यंत स्वत: मंडलिक संजय घाटगे यांच्या नावांची घोषणा करीत नाहीत तोपर्यंत गट म्हणून एकजूट होण्यात अडचणी होत्या. त्या सगळ््या अडचणी, संभ्रम गुरुवारी दूर झाला. या मेळाव्यात उमेदवारी जाहीर होणार हे माहीत असल्याने घाटगे यांनीही जय्यत तयारी केली होती. ते व्यासपीठावर आल्यावर त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. मंडलिक यांचा कार्यक्रम असताना तिथे घाटगे यांना एवढा प्रतिसाद मिळाला कारण घाटगे गटाचेच लोक तिथे जास्त होते. (प्रतिनिधी)