किणी येथे विधी सेवा समितीचे मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:35+5:302021-02-23T04:37:35+5:30

हातकणंगले तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने किणी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सभागृहात जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित ...

Legal Services Committee Guidance Camp at Kini | किणी येथे विधी सेवा समितीचे मार्गदर्शन शिबिर

किणी येथे विधी सेवा समितीचे मार्गदर्शन शिबिर

हातकणंगले तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने किणी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सभागृहात जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.

यावेळी ज्येष्ठ नागरिक कायदा व ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणकारी योजना, अत्याचारग्रस्त व पीडित महिलांसाठीच्या मदत व पुनर्वसन योजना या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक ॲड एन. आर. पाटील, ॲड. आर. एम. गावडे, ॲड विवेक कमलाकर यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्या योगिता दणाने, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. ए. पाटील, मधुकर खोपडे, वडगाव न्यायालयाचे सहायक अधीक्षक बी. एस. पाटील, सागर पाटील, निखिल रणदिवे यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका विधी सेवा समितीच्या वतीने किणी( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलताना दिवाणी न्यायाधीश जे. एस. गायकवाड, व्यासपीठावर एन. आर. पाटील, सरपंच सुप्रिया समुद्रे, उपसरपंच अशोक माळी, आदी उपस्थित होते.

Web Title: Legal Services Committee Guidance Camp at Kini