शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away: कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा दादांना अखेरचा निरोप; शिरोळ, नृसिंहवाडी, हेरवाड येथे कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:55 IST

अंत्यसंस्काराला उपस्थिती, अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली

कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांना अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्यातील अनेक नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पवार यांच्या अपघाती निधनाने बुधवारपासून समाजमन सुन्न झाले आहे. असे व्हायला नको होते अशीच भावना प्रत्येकाच्या तोंडी आहे.

यावेळी खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी उपस्थित राहून अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध निवडणुकीत जिल्ह्यातील कानाकोपरा पिंजून काढला होता. सर्वच पक्ष, संघटनेत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कोल्हापूरशी त्यांचे जवळचे नाते होते. म्हणून निधी देण्यातही त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही, अशा प्रतिक्रिया सामान्यातूनही व्यक्त झाल्या. 

समाजमन अद्याप सुन्न

दरम्यान, अचानकपणे त्यांच्या अपघाती निधन झाल्याने अनेकांना जबर धक्का बसला. राजकीय जीवनात त्यांच्यामुळे उभारी मिळालेले पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाही. त्यांनी बारामती येथे जावून उपमुख्यमंत्री पवार यांचे अंत्यदर्शन घेतले. बुधवारीही निधनाचे वृत्त कळताच जिल्हयातील सर्वच पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बारामती गाठले. रात्रीही तिकडे जाण्यासाठी वाहनांची रीघ लागली होती. दरम्यान, कर्नाटक विधानसभेत महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगावात केएलई संस्थेचे प्रमुख प्रभाकर कोरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

शिरोळ, नृसिंहवाडी, हेरवाड येथे कडकडीत बंद

शिरोळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली आहे. शिरोळ पालिकेने बुधवारी मासिक सभा तहकूब करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी शिरोळ शहर बंद ठेवून व्यापारी व नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्ताने बारामती दौऱ्यावर विमानातून येत असताना बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यामध्ये त्यांच्यासह विमानातील सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. प्रत्येक गावात साश्रुपूर्ण नयनांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यात आली.

बुधवारी शिरोळ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून मासिक सभा तहकूब केली. गुरुवारी व्यापारी असोसिएशनने शहर बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. हेरवाड, नृसिंहवाडी येथेही बंद पाळण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mourning Ajit Pawar's Death: Kolhapur Leaders Pay Last Respects, Shutdown Observed

Web Summary : Kolhapur mourns Deputy Chief Minister Ajit Pawar's death. Leaders and citizens paid respects at his funeral. Shirol, Nृसिंहवाडी, and Herwad observed a complete shutdown. His sudden demise shocked many, with numerous individuals and political figures expressing grief and offering condolences.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर