शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या ‘अनिकेत’ची सव्वादोन कोटींची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

कोल्हापूर : भारतीय फुटबॉलचे आयडॉल सुनील छेत्री, बायचुंग भुतिया, ग्रे हुपर, अदम लिफोंड्रे, इद्रीसा सियाल, इस्मार अशा दिग्गज ...

कोल्हापूर : भारतीय फुटबॉलचे आयडॉल सुनील छेत्री, बायचुंग भुतिया, ग्रे हुपर, अदम लिफोंड्रे, इद्रीसा सियाल, इस्मार अशा दिग्गज फुटबाॅलपटूंनी अमुक एका संघासाठी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजवर करारबद्द झाल्याचे आपण वाचले आहे. याच रांगेत आता कोल्हापूरचा युवा फुटबाॅलपटू अनिकेत जाधवही जाऊन बसला आहे. बुधवारी हैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांकरिता खेळण्यासाठी तब्बल २ कोटी २५ लाखांच्या करारावर त्याने स्वाक्षरी केली. इतक्या मोठ्या रकमेचा करारबद्ध होणारा तो पहिला महाराष्ट्रीयन फुटबाॅलपटू ठरला आहे.

अनिकेतने फुटबाॅलचे सुरुवातीचे धडे क्रीडा प्रबोधनीमधून गिरविले. त्याच्या खेळाची चुणूक पाहून प्रथम पुणे एफसी अकॅडमीतून तीन वर्षांसाठी निवड झाली. अनेक वयोगटांत खेळल्यानंतर २०१५ ला त्याची भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा युवा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या शिबिरासाठी निवड झाली. त्यातून त्याची भारतीय युवा संघात निवड झाली. तो भारतीय संघाचा मुख्य आधार बनला होता. युवा विश्वचषकानंतर त्याची वर्णी भारतीय फुटबाॅल संघाच्या ॲरोजकडून झाली. तेथेही त्याने कौशल्य दाखवले. याच कामगिरीवर त्याची जमशेदपूर एफसी संघात निवड झाली. आयलीग आणि त्यानंतर आयएसएलमध्ये प्र‌‌वेश केला. त्याने त्या हंगामात २७ सामन्यांत गोल करून चुणूक दाखविली. यादरम्यान ब्लॅकबर्न रोव्हर्समध्ये त्याला तीन महिन्यांचे व्यावसायिक प्रशिक्षणही लाभले. त्यात त्याच्या कौशल्याचा गौरव करण्यात आला. या सर्व कामगिरीची दखल घेत हैदराबाद एफसी संघाने त्याला बुधवारी तीन वर्षांकरिता करारबद्ध केले.

कोट

एचएफसी संघातील अनिकेतच्या समावेशामुळे त्याच्या अष्टपैलूपणासह संघातील स्पर्धा वाढेल. तरुण खेळाडूंनी, विशेषत: फाॅरवर्डनी नियमित खेळण्याची गरज आहे. त्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.

मानोलो मार्केझ,

मुख्य प्रशिक्षक, हैदराबाद एफसी

प्रतिक्रिया

मी हैदराबाद एफसीकडून खेळण्यासाठी अधीर झालो आहे. मी क्लबमध्ये उत्साहवर्धक पथक आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याची अपेक्षा करीत आहे. या संघाकडून करारबद्ध होताना मला आनंद होत आहे.

- अनिकेत जाधव, युवा फुटबाॅलपटू

फोटो : २१०७२०२१-कोल-अनिकेत जाधव