शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ऐतिहासिक वारसा जपण्यात कोल्हापूरकरांचा पुढाकार--शाहू छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:13 PM

१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘हेरिटेज वीक’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे: ‘हेरिटेज सप्ताह’चे उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तो जपण्यासाठी कोल्हापूरकरांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. येथील माणसांमध्ये ऐतिहासिक वारसा जपण्याचा ध्यासच असल्याने प्रशासनाच्या जोडीला विविध संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते अशा वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न करतात. त्यामुळे ‘हेरिटेज सप्ताह’ यशस्वी होईल, असा विश्वास मंगळवारी शाहू छत्रपती यांनी येथे व्यक्त केला.

कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस येथे जिल्हा प्रशासन हेरिटेज समितीतर्फे आयोजित हेरिटेज सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. १९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘हेरिटेज वीक’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहीर आझाद नायकवडी यांनी रचलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसवरील पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर यांनी हेरिटज सप्ताह साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच शहर आणि परिसरातील पुरातन वास्तूंमुळे कोल्हापूरचे महत्त्व जगाच्या नकाशावर वाढत असल्याने त्यांचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

यानंतर जन्मस्थळाच्या परिसरात झालेल्या हेरिटेज वॉकला युवक युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी ‘क्रिडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, ‘आयआयडी’चे संदीप घोरपडे, चंदन मिरजकर, हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, आनंद माने, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, विजय केसरकर तसेच रोटरी क्लबचे सूर्यकांत पाटील, गिरीश जोशी, शाहीर डॉ. राजू राऊत उपस्थित होते.कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस येथे मंगळवारी शाहू छत्रपती यांच्या हस्ते ‘जागतिक वारसा सप्ताहा’चे उद्घाटन झाले. यावेळी आनंद माने, अमरजा निंबाळकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आझाद नायकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती