शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: भाजपच्या पल्लवी देसाई हताश होवून निघून गेल्या, नंतर मात्र हसल्या; केवळ १६ मतांनी विजयी झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:04 IST

काँग्रेसच्या उमेदवार सरोज सरनाईक यांच्या 'ती' चूक लक्षात आली अन्..

कोल्हापूर : दुसऱ्या फेरीत मतांची बेरीज करण्याआधीच मते कमी मिळाली म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी मतदान केंद्र सोडले खरे, मात्र, पुढच्या पंधराच मिनिटांत १६ मतांनी विजयी झाल्याचा फोन खणाणला अन् त्याच पाणावलेल्या डोळ्यांचे आनंदाश्रूत रूपांतर झाल्याचा क्षण रमणमळ्यातील मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी पाहायला मिळाला. 

भाजपच्या उमेदवार पल्लवी निलेश देसाई या प्रभाग क्रमांक ५ मधून सर्वसाधारण महिला गटातून विजयी झाल्या. येथे देसाई यांच्याविरोधात काँग्रेसच्या सरोज सरनाईक रिंगणात होत्या. या प्रभागाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या सरनाईक यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत काही टेबलवर देसाई तर काही टेबलवर सरनाईक यांना जादा मते होती. या फेरीची मतमोजणी सुरू असतानाच आपणाला मते कमी मिळाल्याचा गैरसमज करुन देसाई यांनी मतदान केंद्र सोडले. 

इकडे सरनाईक यांनी मतांची बेरीज केल्यानंतर १६ मतांनी पराभूत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क गटातील फेरमोजणी केली; मात्र यातही मतांमध्ये कोणताच बदल झाला नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे यांनी १६ मतांनी देसाई यांना विजयी घोषित केले. येथे पल्लवी देसाई यांना ७१६४ तर सरनाईक यांना ७१४८ मते मिळाली.

देसाई यांचा दिलदारपणा

पराभूत झाल्याचा गैरसमज करून निघून गेलेल्या देसाई यांनी विजयी झाल्याचे कळताच तत्काळ मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर त्यांनी निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या सरनाईक यांच्या हातात हात देऊन त्यांची गळाभेट घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election Drama: Desai Initially Departs in Despair, Wins by 16 Votes!

Web Summary : Pallavi Desai, initially disheartened, left the counting center, only to win Kolhapur's election by a narrow 16-vote margin after a recount request. She graciously greeted her opponent after the result.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेस