शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’; रविवारी विद्यापीठात होणार प्रॅक्टिस रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:01 PM

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वातील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहभागी नागरिकांचा धावण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने रविवारी (दि. १६) शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात पाच किलोमीटर प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करणाऱ्या नागरिकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे ‘लोकमत महामॅरेथॉन’; रविवारी विद्यापीठात होणार प्रॅक्टिस रनस्पॉट नावनोंदणीला विशेष सवलत

कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वातील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहभागी नागरिकांचा धावण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने रविवारी (दि. १६) शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात पाच किलोमीटर प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करणाऱ्या नागरिकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.कोल्हापुरातील पहिल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला होता. यंदा ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या महामॅरेथॉनमधील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच नावनोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.दैनंदिन जीवनात प्रत्येकजण तंदुरुस्त राहावा, या हेतूने या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांना स्पर्धेच्या मार्गाचा सराव व्हावा, धावताना कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबरोबरच धावण्याच्या विविध टिप्सही तज्ज्ञांकडून यावेळी देण्यात येणार आहेत.

ही ‘प्रॅक्टिस रन’ सर्वांसाठी मोफत खुली आहे. सहभागी प्रत्येक नागरिकाला येथील मार्गावर एनर्जी ड्रिंक, पिण्याचे पाणी तसेच फलाहार देण्याची सोय केली आहे. तरी या प्रॅक्टिस रनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मोबाईल नंबर ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर संपर्क साधावा.

असे आहेत गटमहामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त वर्षांवरील) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटरची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे.

विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटवर नावनोदणी करावी किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा व नोंदणी करावी. नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे. महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

  1.  प्रॅक्टिस रनमध्ये मिळणार रनिंगच्या टिप्स
  2.  स्पॉट नोंदणीला विशेष सवलत
  3.  निसर्गरम्य परिसरात धावण्याचा सराव
  4. एनर्जी ड्रिंक, पिण्याचे पाणी तसेच फलाहाराची सोय
  5. प्रॅक्टिस रनमध्ये मोफत सहभागाची संधी.

 

मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात आपण पायी चालणे, धावणे पूर्णपणे विसरलो आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने कोल्हापुरात पळण्याची उत्कृ ष्ट संधी मिळाली आहे. धावण्यामुळे हाडे मजबूत होतात, नैराश्य कमी होते, त्यामुळे धावणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. मॅरेथॉनमुळे आपल्या सर्वांना अनोखी संधी मिळाली आहे. तिचा फायदा आपण सर्वांनीच घ्यावा.- सुभाषचंद्र देसाई,मोटार वाहन निरीक्षक 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर