शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

कोल्हापूर : महामॅरेथॉन नावनोंदणीस उदंड प्रतिसाद ; नोंदणीला उरले मोजकेच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:46 PM

लोकमत ‘ महामॅरेथॉन ’ ची घोषणा झाल्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरातील धावपटूंमध्ये सहभागी होण्यासाठी आतुरता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नावनोंदणीसह उदंड प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्दे१८ फेबु्रवारीला रंगणार महामॅरेथॉन, कोल्हापूरसह राज्यातील धावपटूंत आतुरता सर्वाधिक बक्षिसांची पहीली मॅरेथॉन ; दिग्गाजांचा सहभाग मुख्य प्रायोजक ‘राजुरी स्टील ’ , सह प्रायोजक ‘ वारणा दुध संघ ’

कोल्हापूर : लोकमत ‘ महामॅरेथॉन ’ ची घोषणा झाल्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरातील धावपटूंमध्ये सहभागी होण्यासाठी आतुरता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे नावनोंदणीसह उदंड प्रतिसाद लाभत आहे.

वैयक्तिक आणि सामुहीक नोंदणीवरही नागरीक, धावपटू, कंप्यातील कर्मचारी, महीला यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. यंदा सर्व संरक्षक दले, पोलीस होमागार्ड, विशेष राखीव दलातील धावपटूंसाठी विशेष बक्षिसेही या महामॅरेथॉनची वैशिष्ट्ये ठरणार आहे.कोल्हापूरसह राज्यातील नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरात ही महामॅरेथॉन होत आहे. यापैकी औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी उदंड प्रतिसादामध्येही महामॅरेथॉन झाली आहे. तर नागपूर व कोल्हापूर येथील महामॅरेथॉन नागपूरला ११ फेबु्रवारी व कोल्हापूरला १८ फेबु्रवारीला ही मॅरेथॉन होत आहे.

यात सहभागी होणाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरावी या उद्देशाने ज्या शहरात महामॅरेथॉनचे आयोजन होणार आहे . त्या शहराचा नकाशा असलेले पदक विजेत्यांना देण्यात येणार आहे. नाशिक व औरंगाबाद येथे झालेल्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना त्या शहराचा नकाशा आहे. अशीच धाव आपल्या कोल्हापूर शहरातही होत आहे. त्याही नकाशा असेलेले मेडल बक्षिस दिले जाणार आहे.

चार शहरात आयोजित केलेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन मेडल जो जिंकेल त्याची चारही मेडल एकत्र करुन जुळवल्यानंतर महाराष्ट्राचा नकाशा बनणार आहे.नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच अ‍ॅथलिट क्रीडाप्रकाराला चालना मिळावी, या हेतूने ‘लोकमत’तर्फे कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड येथे १८ फेबु्रवारीला ‘महामॅरेथॉन’चे आयोजन केले आहे.

गट निहाय प्रवेश शुल्क असे,- ३ किलोमीटर गट - ९६० रुपये (चार व्यक्तिंसाठी)-५ किलोमीटर गट - ४८० रुपये (एका व्यक्तीसाठी)-१० किलोमीटर गट- ९६० रुपये ( एका व्यक्तिसाठी)- २१ किलोमीटर गट - डिफेन्स गट- ८०० रुपये (एका व्यक्तिसाठी)- या प्रवेश शुल्कात आकर्षक टी-शर्ट, गुडी बॅग, सहभाग प्रमाणपत्र, सहभाग सन्मान पदक, टायमिंग चिप, अल्पोहार मिळणार आहे.

सहा लाखांची बक्षिसे अशीरन                              वयोगट                    गट                            प्रथम                द्वितीय                         तृतीय

२१ कि.मी                    १८ ते ४५       पुरुष (खुला) भारतीय            २५,०००              २०,०००                   १५,००० रु.                                   १८ ते ४०       महिला(खुला) भारतीय          २५,०००              २०,०००                  १५,००० रु.                                   ४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ) भारतीय              २५,०००              २०,०००                 १५,००० रु.                                  ४० वर्षांवरील महिला (प्रौढ) भारतीय            २५,०००             २०,०००                १५,००० रु.                                  १८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू)     २०,०००             १५,०००                                  १८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू) २०,०००             १५,०००                                    १८ ते ४५ वयोगट पुरुष (खुला) भारतीय       १५,०००             १२,०००                  १०,०००                                    १८ ते ४० वयोगट महिला (खुला) भारतीय    १५,०००           १२,०००                   १०,०००                                    ४५ वर्षांवरील पुरुष (प्रौढ गट) भारतीय         १५,०००            १२,०००                  १०,०००१० कि.मी.                   ४० वर्षांवरील महिला (प्रौढ गट)भारतीय         १५,०००           १२,०००                 १०,०००                                  १८ ते ४५ वर्षांवरील पुरुष (परदेशी खेळाडू )       १५,०००          १०,०००                                    १८ ते ४० वर्षांवरील महिला (परदेशी खेळाडू)  १५,०००            १०,०००

डिफेन्स कप रन फॉर द कप    पुरुष, महिला (लष्करी दल, पोलीस)       २५,०००        २०,०००                 १५,०००

त्वरा करा... नोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक!‘महामॅरेथॉन’मधील सहभागासाठी येथे करा नोंदणीमहामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९८८१८६७६००, ९६०४६४४४९४ वर नोंदणी करता येणार आहे.

 

माझे वय ६१, मी सुद्धा धावणारधावणे हा सर्वात उपयुक्त, सोपा, जास्त फायदे देणआरा, कमी खर्च असलेला जगातील सर्व तज्ज्ञांनी मान्य केलेला मार्ग आहे. सध्याच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमध्ये एक तास धावण्यासाठी स्वतंत्र वेळ ठेवणे म्हणजे मेन्टेन्स होणार आहे. जीवनचक्रात तो नाही ठेवला तर विविध व्याधींना आपोआप आमंत्रण मिळते. त्यासाठी धावलेच पाहीजे. धावणे हा ह्दयासाठी लागणारा अत्यंत उत्कृष्ट व्यायाम आहे. मी ६१ व्या वयातसुद्धा अर्धा तास सलग धावू शकतो. फास्ट टष्ट्वीच या प्रकारात माझी खासीयत आहे. दररोज मी न चुकता दीड ते दोन तास मी मैदानावर कसुन सराव करतो. वयाच्या ४५ व्या वर्षापासून मी हा सरावात सातत्य ठेवले आहे. व्यायामास वेळ देणे म्हणजे जीवन सुकर करणे होय.- सुहास सोळंकी,कोल्हापूर, ज्येष्ठ धावपटू

 

 

मी धावणार तुम्हीसुद्धा सहभागी व्हाधावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. आरोग्य चांगले राहीले तर मन तजेल बनते. त्यामुळे विनासाहीत्याचा व्यायाम म्हणून धावणे सर्वोत्तम व्यायाम आहे. तरी मी लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन धावणार आहे, तुम्हीसुद्धा सहभागी होऊन धावा.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

 

 

धावणे सर्वोत्तम व्यायाम ; ‘ महामॅरेथॉन’ मध्ये सहभागी व्हाआरोग्य चांगले राखण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणून धावणे या खेळ प्रकाराकडे पाहीले जाते. धावपळीच्या जगात थोडा वेळ काढून व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाच्या वातावरण निमिर्तीसाठी धावणे आवश्यक आहे. मी माझ्यासह अधिकारी कर्मचारी व कुटूंबासह लोकमत च्या महामॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहे. तुम्ही मागे राहू नका तुम्हीसुद्धा सहभागी होऊन धावा.- संजय मोहिते,जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathon 2018लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉन २०१८kolhapurकोल्हापूर