शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बूट पॉलिश व्यवसायात अडथळा आणतो म्हणून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:24 IST

बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा आणतो म्हणून एकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा सुभाषनगरात घडला. या घटनेत शिवाजी साताप्पा पाटील (वय ३८, रा. सुभाषनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबूट पॉलिश व्यवसायात अडथळा आणतो म्हणून चाकूहल्लासुभाषनगरातील प्रकार : एक जखमी; दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा आणतो म्हणून एकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा सुभाषनगरात घडला. या घटनेत शिवाजी साताप्पा पाटील (वय ३८, रा. सुभाषनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.सुभाषनगर झोपडपट्टीमध्ये शिवाजी पाटील हे राहात आहेत. मंगळवारी संजय गवळी व सचिन गवळी हे दोघे भाऊ तेथे आले. त्याने शिवाजीला घरातून बाहेर बोलावले. तू माझ्या बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा का करतोस, असा त्याला जाब विचारला.

यातून वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर दोघांनी शिवाजीला शिवीगाळ करत त्याच्यावर काठी व चाकूहल्ला करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये शिवाजी पाटील हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संजय दत्तात्रय गवळी (वय ३६), सचिन दत्तात्रय गवळी (वय ३४, दोघेही रा. सुभाषनगर झोपडपट्टी) या दोघा सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवनाथ घुगरे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर