शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात शिपायाच्या साॅक्समध्ये सापडली बंदीजनांची चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

कोल्हापूर : मोबाईल, गांजा प्रकरणावरून कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असतानाच, आता कारागृहातील शिपायाच्या बुटामध्ये बंदीजनाने लिहिलेल्या दोन ...

कोल्हापूर : मोबाईल, गांजा प्रकरणावरून कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असतानाच, आता कारागृहातील शिपायाच्या बुटामध्ये बंदीजनाने लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात राबविलेल्या कर्मचाऱ्यांच्या झडती मोहिमेत प्रकार उघडकीस आला. किसन बिरलिंगे असे या शिपायाचे नाव आहे. त्याच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली.

कळंबा कारागृहातील मोबाईल प्रकरण चव्हाट्यावर आल्याने काही बंदीजनांनी शिपायामार्फत नातेवाईकांना चिठ्ठ्या पाठवण्याचा फंडा सुरू केला. याची माहिती मिळाल्याने शनिवारी कारागृहातील शिपायांची झडती घेतली. एका शिपयाच्या बुटाच्या साॅक्समध्ये दोन चिठ्ठ्या आढळल्या. चिठ्ठीवर असलेल्या नावाच्या संबधित बंदीच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी आपला संबंध नसल्याचे हात वर केले, असेही अधीक्षक इंदूरकर यांनी सांगितले.

चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला २५ हजार रुपये द्या...

गेल्या महिन्यात कारागृहात सापडलेला मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा ठपका एका पोलीस शिपायावर ठेवण्यात आला. त्यानंतर आता आणखी एका पोलीस शिपायाच्या साॅस्कमध्ये बंदीजनांची चिठ्ठी सापडणे म्हणजे गंभीर आहे. शिपाई बिरलिंगे याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवर, माझे अर्जट काम आहे, मला २५ हजार रुपये लागणार आहेत, चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला २५ हजार रुपये द्यावेत, असा मजकूर लिहिला आहे.