शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

आवक घटली, कांदा दर उतरला, सौदे सुरळीत : बाजार समितीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 6:02 PM

बाजार समितीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आणि दर उतरले तरी गुरुवारी सौदे मात्र सुरळीत निघाले. बुधवारी दर पडल्याचा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी गोंधळ घालत कांद्याचे सौदे बंद पाडले होते.

ठळक मुद्देआवक घटली, कांदा दर उतरलासौदे सुरळीत : बाजार समितीतील चित्र

कोल्हापूर : बाजार समितीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आणि दर उतरले तरी गुरुवारी सौदे मात्र सुरळीत निघाले. बुधवारी दर पडल्याचा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी गोंधळ घालत कांद्याचे सौदे बंद पाडले होते. समिती प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सौदे पूर्ववत झाले होते. कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून बाहेर काढल्यानंतर सर्वत्र कांद्याचे दर दुपटीने वधारले आहेत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र दर उतरला आहे.कांद्याची आवक बुधवार (दि. २३)च्या तुलनेत दोन ते अडीच क्विंटलनी घटली आहे. गुरुवारी आठ हजार ६७३ क्विंटल आवक झाली. बुधवारी हीच आवक १० हजार ७७४, तर मंगळवारी आठ हजार ८२३ होती. दर क्विंटलमागे ६० रुपयांनी कमी झाले आहेत. बुधवारी किमान दर १००, तर कमाल ४२० रुपये, सरासरी २६० रुपये क्विंटल होते. गुरुवारी यात घट होऊन किमान १००, तर कमाल ४००, तर सरासरी २०० रुपये इतका राहिला.

कोल्हापूर बाजार समितीत स्थानिक कांदा येत नाही. लासलगाव, नाशिक, सोलापूर, कर्नाटक येथून कांदा सौद्यांसाठी येतो. येथे दर चांगला मिळत असल्यानेच शेतकरी प्राधान्य देतात. यातून बाजार समितीला सेसच्या माध्यमातून लाखो रुपये मिळतात. तथापि कमी दरावरून येथेही खटके उडू लागले आहेत. इतर बाजार समित्यांमध्ये दर वाढत असताना कोल्हापुरात कमी दराने सौदे निघत असल्याने बाहेरील शेतकऱ्यांनी माल पाठविताना हात आखडता घेतला.

टॅग्स :onionकांदाkolhapurकोल्हापूर