महापालिका अंदाजपत्रकात तज्ज्ञांच्या सूचनांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:48+5:302021-01-21T04:22:48+5:30

कोल्हापूर : महापालिकेचे अंदाजपत्रक अधिकाऱ्यांनी तयार करायचे, त्यात लोकप्रतिनिधींनी अदलाबदल करायचे, ही पारंपरिक पद्धत मोडून आता फेब्रुवारी महिन्यात तयार ...

Include expert suggestions in the municipal budget | महापालिका अंदाजपत्रकात तज्ज्ञांच्या सूचनांचा समावेश

महापालिका अंदाजपत्रकात तज्ज्ञांच्या सूचनांचा समावेश

कोल्हापूर : महापालिकेचे अंदाजपत्रक अधिकाऱ्यांनी तयार करायचे, त्यात लोकप्रतिनिधींनी अदलाबदल करायचे, ही पारंपरिक पद्धत मोडून आता फेब्रुवारी महिन्यात तयार होणाऱ्या अंदाजपत्रकात प्रथमच शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवर, सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे. नागरिकांना नेमके काय अपेक्षित आहे, ते देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे करणार आहेत.

याबाबत पत्रकारांना माहिती देताना, बलकवडे यांनी सांगितले की, महापालिका नागरिकांकडून कर घेते, मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. नवीन आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अंदाजपत्रक हे ‘आपले अंदाजपत्रक’ वाटावे म्हणून आम्ही नागरिकांच्या सूचना, कल्पनांचा विचार करणार आहोत. समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मग ते डॉक्टर्स, आर्किटेक्ट, इंजिनिअर, वकील, निवृत्त अधिकारी, निवृत्त इंजिनिअर यांनी पुढे येऊन त्यांच्या अपेक्षा, योजना आम्हाला सांगाव्यात. त्याचा आम्ही अंदाजपत्रक तयार करताना विचार करणार आहोत.

क्रिडाई, आर्किटेक्टस‌्, इंजिनिअर असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी, सामाजिक संघटना, नागरिकांनी त्यासाठी पुढे यावे. त्यांनी आपल्या सूचना, नवीन योजना व निवेदने याची माहिती लिखित स्वरूपात जनसंपर्क अधिकारी यांच्या कार्यालयात २९ जानेवारीपर्यंत सादर करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पार्किंगला शिस्त लावणार-

शहरातील पार्किंगची व्यवस्था फारच अडचणीची आहे. त्यामुळे प्राधान्याने शहरातील पार्किंगच्या जागा निश्चित करून पांढरे पट्टे मारणार आहोत. आधी नागरिकांना सुविधा देऊ मग त्यांना शिस्त लावू. त्यानंतरच अतिक्रमण काढू, असे बलकवडे यांनी सांगितले.

-खुल्या जागा झाल्या मोकळ्या -

महापालिकेच्या खुल्या जागांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू झाले असून, आतापर्यंत २२ जागांवरील अतिक्रमणे हटविली आहेत. पुन्हा पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून त्या परिसरात वृक्षारोपण, कंमाउंड केले जाणार आहे. स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या परिसरातील अशा जागांवर सीएसआर फंडातून विकास करण्यास पुढे यावे, असे आवाहन बलकवडे यांनी केले.

Web Title: Include expert suggestions in the municipal budget