शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात होमिओपॅथीचे महत्त्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना काळात अर्सेनिक अल्बम या औषधाचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून झाल्यामुळे होमिओपॅथीचे महत्त्व वाढले. असे प्रतिपादन शिवाजी ...

कोल्हापूर : कोरोना काळात अर्सेनिक अल्बम या औषधाचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून झाल्यामुळे होमिओपॅथीचे महत्त्व वाढले. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी.टी. शिर्के यांनी केले. होमिओपॅथिक मेडिकल काॅलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा)ने ताराराणी चौक (कोल्हापूर) येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘होमेसाकाॅन २०२१’परिषदेच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डाॅ. शिर्के म्हणाले, होमिओपॅथींनी आयुष्यभर नवनवे शिकत राहावे व स्वत:चे वैद्यकीय ज्ञान सतत अपडेट ठेवून संशोधनाची नाते जोडावे. ज्यामुळे संपूर्ण समाज आरोग्यदायी राहील. कोरोना संक्रमणात वैद्यकीय क्षेत्रातील होमिओपॅथीसह सर्वच विभागांचे महत्त्व वाढले आहे. हे नाकारून चालणार नाही. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले.

‘नॅशनल कमिशन फाॅर होमिओपॅथी’ची रचना, कायदा व उद्दिष्ट्ये यासह त्याचा होमिओपॅथी औषधप्रणालीच्या विकासावर होणारे परिणाम प्राचार्य डाॅ. रोझारिओ डिसोझा (गडहिंग्लज) यांनी यांनी विषद कले. परिषदेत डाॅ. मनीषा शर्मा (मुंबई), डाॅ. पायल परमार (मुंबई) यांचेदेखील व्याख्यान झाले. प्रारंभी होमेसा प्रेसिडेंट डाॅ.राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. संयोजक सचिव डाॅ. सुनेत्रा शिराळे यांनी ‘कोरोना-काहीही कायमचे टिकत नाही’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. सचिव डाॅ. राजेश कागले यांनी आभार मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी डाॅ. हिम्मतसिंह पाटील, डाॅ. सुहास पाटील, डाॅ. अन्वर गंजेली, डाॅ. हर्षवर्धन जगताप, डाॅ. शीतल पाटील, डाॅ. सुधीर जरे आदींनी परिश्रम घेतले. परिषदेत तीन हजारांहून होमिओपॅथसनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला होता.

फोटो : २५०३२०२१-कोल-होमिओपॅथी काॅलेज न्यूज

ओळी : कोल्हापुरातील ताराराणी चौकातील होमिओपॅथिक मेडिकल काॅलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा)तर्फे ‘होमेसाकाॅन’ परिषदेचे उद‌्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. डी.टी.शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

===Photopath===

250321\25kol_1_25032021_5.jpg

===Caption===

फोटो : २५०३२०२१-कोल-होमिआेपॅथी काॅलेज न्यूज आेळी : कोल्हापूरातील ताराराणी चौकातील होमिआेपॅथिक मेडीकल काॅलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) तर्फे  होमिआेपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘होमेसाकाॅन २०२१’परिषदेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. डी.टी.शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.