शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाचणी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन

By admin | Updated: April 7, 2015 01:31 IST

तक्रार करूनही दुर्लक्ष : शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात; पर्यावरणावर मोठा परिणाम

सडोली खालसा : करवीर तालुक्यातील बाचणी ते सडोली खालसा परिसराच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून गौण खनिज उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. या अवैधरीत्या गौन खनिज उत्खननाकडे मंडल अधिकारी, तलाठी दुर्लक्ष करत असल्यामुळे ठेकेदारांचे उखळ पांढरे होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गौन खनिज मिळविण्यासाठी डोंगर उद्ध्वस्त होत असल्याने त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे.बाचणी व सडोली खालसा ही दोन गावे जवळ-जवळ असूनही सडोली गावचा परिसर हळदी मंडल अधिकारी अंतर्गत, तर बाचणी गाव बीड मंडल अधिकारी अंतर्गत येतो. या दोन्ही गावची शीव एकच असून, या गावाच्या हद्दीतील खिंड या क्षेत्राजवळ मोठमोठे डोंगर आहेत. याठिकाणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ठेकेदारांकडून व महसूल विभागाच्या आशीर्वादामुळे गौन खनिज उत्खनन होत आहे, तर तुळशी नदीपात्रातही अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. याकडे सरकारी बाबूंनी दुर्लक्ष केल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, तर ठेकेदार मालामाल होत आहेत.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे अवैध उत्खनन काही ठेकेदारांकडून सुरू असतानाही एकदाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यांच्याकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पोलीसपाटलांनी हे उत्खनन थांबविले व घटनेचा पंचनामा केला. परंतु, बीड मंडल अधिकाऱ्यांनी पोलीसपाटलांवर दबाव टाकून हे प्रकरण मागे घ्या, असे सांगितले. तसेच उत्खनन थांबविण्यास सांगितले. मात्र, आजही हे गौनखनिज उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. याकडे करवीर उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून शासनाला कोट्यवधी रुपयांचा कर रूपाने चुना लावणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)दोन वर्षांपासून खिंडी परिसरात मोठ्या प्रमाणात गौनखनिजाचे उत्खनन सुरू आहे. वेळोवेळी याची माहिती व पकडून देऊनसुद्धा याकडे महसूल विभागाने का दुर्लक्ष केले याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. याकडे तहसीलदारांनी लक्ष घालून लाखो रुपयांचा कर वाचवावा.- बंडोपंत मारुती कुंभार, पोलीसपाटील, बाचणी, ता. करवीर.