शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत अल्पदरात कर्जाच्या आमिषाने गंडा

By admin | Updated: September 5, 2014 23:23 IST

तक्रार दाखल : बंगलोरच्या कंपनीची जाहिरात

इचलकरंजी : अल्पदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून येथील लिगाडे मळ्यात राहणाऱ्या गजाननसिंग भगतसिंग रजपूत यांची ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सरस्वती फायनान्स प्रा. लि. बंगलोर-कर्नाटक या कंपनीमार्फत फसव्या जाहिराती देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, १६ जानेवारी २०१४ रोजी सरस्वती फायनान्स कंपनीची ‘बेरोजगारांना अल्पदरात कर्ज’ अशी जाहिरात बघून रजपूत यांनी संबंधित कंपनीत फोन लावला. तेथे व्यवस्थापक अमित कुमार यांनी तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार दोन लाख रुपये कर्ज मिळू शकते. त्यासाठी कागदपत्रे कंपनीच्या ई-मेलवर पाठवा, असे सांगितले. १९ जानेवारीला रजपूत यांनी कागदपत्रे पाठविली. लगेचच २० जानेवारीला कंपनीचा त्यांना फोन आला. तुमचे कर्ज मंजूर झाले असून, त्यासाठी तीन हजार रुपये कंपनीच्या खात्यावर भरा, असे सांगण्यात आले. त्यानुसार रजपूत यांनी कंपनीच्या बॅँक खात्यावर तीन हजार रुपये भरले. त्यानंतर वेळोवेळी २४ तारखेपर्यंत कंपनीने वेगवेगळी कारणे पुढे करीत दहा, वीस व तेरा हजार ५०० असे एकूण ४६ हजार ५०० रुपये रजपूत यांच्याकडून खात्यावर भरून घेतले. त्यानंतर पुन्हा कर्ज ट्रान्स्फर करण्यासाठी १५०० रुपयांची मागणी केली. मात्र, कंपनी आपल्याकडून वेळोवेळी पैसे भरून घेत आहे. कर्ज मात्र देत नाही, असे लक्षात आल्याने रजपूत यांनी पैसे भरण्यास नकार दिला.त्यानंतर त्यांनी कर्ज द्या, मगच पैसे भरतो, असा कंपनीकडे तगादा लावला. काही दिवसांतच कंपनीने जाहिरातीत दिलेले फोन नंबर स्विच आॅफ झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. म्हणून रजपूत यांनी आज, शुक्रवारी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीची तक्रार नोंद केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. के. कांबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)