शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: November 28, 2014 00:13 IST

जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष : मुरगूडमधील कन्या शाळेची जुनी इमारत धोकादायक

अनिल पाटील - मुरगूड येथील कन्या शाळेची जुनी इमारत वापराविना तशीच पडून आहे. जिल्हा परिषदेने या इमारतीकडे दुर्लक्ष केल्याने ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या इमारतीच्या अवतीभोवती कन्या शाळा व जीवन शिक्षण विद्यामंदिरमधील शेकडो विद्यार्थी वावरतात, खेळतात. त्यामुळे या शेकडो चिमुकल्यांचा जीव धोक्यात असून, जिल्हा परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की, दुर्घटना घडल्यानंतरच लक्ष देणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.कन्या शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या जुन्या इमारतीला लागूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुसज्ज आणि भव्य अशी इमारत बांधली. तीन वर्षांपासून कन्या शाळा याच इमारतीमध्ये भरते. पर्यायाने जुनी इमारत वापराविना दुर्लक्षित झाल्याने खिळखिळी झाली आहे. या जुन्या इमारतीचा वापर होत नसल्याने कौले, दरवाजे, चौकटी, लाकूड सामान, लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात चोरीला गेले आहे. यामुळे ही इमारत कधीही कोसळेल, अशी परिस्थिती आहे. सध्या भरत असलेली कन्या शाळा व जीवन शिक्षण विद्यामंदिर या जुन्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने लहान मुले सुटीमध्ये अगर मोठ्या सुटीमध्ये या दोन शाळेतील शेकडो विद्यार्थी समोरील मैदानावर खेळतात. खेळता खेळता हे विद्यार्थी या जुन्या इमारतीमध्ये प्रवेश करतात. कोणत्याच खोलीला दरवाजा नसल्याने अगदी आतपर्यंत ते बिनधास्तपणे वावरत असतात. त्यामुळे विद्यार्थी वावरत असतानाच, जर इमारत कोसळली, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या इमारतीच्या हक्काबाबत जिल्हा परिषद व नगरपरिषद यांच्यामध्ये न्यायालयीन वाद आहे. त्यामुळे या इमारतीकडे दुर्लक्ष झाले असेल, असे अनेक जाणकरांचे मत आहे. वेळोवेळी या मराठी शाळेतील शिक्षकांनी ही इमारत तत्काळ काढून घ्यावी, अशी मागणी वारंवार केली आहे; पण त्यांच्यावरही मर्यादा असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले आहेत. त्यामुळे न्यायालयीन लढाई कोण जिंकायचे ते जिंकू; पण जिल्हा परिषदेने याकडे गांभीर्याने पाहून ही इमारत तत्काळ जमीनदोस्त करून शेकडो विद्यार्थ्यांच्या जिवांचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.