शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -‘कोरोना’मुळे उलाढालच नसल्याने कर भरायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:23 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार, व्यवसायातील उलाढालच मंदावल्याने खेळत्या भांडवलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कर भरायचा कसा असा अनेक व्यापारी, व्यावसायिकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

ठळक मुद्देव्यापारी, व्यावसायिक करदात्यांसमोर अडचणआयकर, जीएसटीसाठी मुदतवाढ मिळावी

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार, व्यवसायातील उलाढालच मंदावल्याने खेळत्या भांडवलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कर भरायचा कसा असा अनेक व्यापारी, व्यावसायिकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

आयकर, जीएसटी (वस्तू व सेवाकर) भवन असो की, चार्टर्ड अकौंटंट, कंपनी सेक्रेटरी यांच्या कार्यालयात जाण्यावर बंधने आल्याने शंकांचे निरसन करणे अडचणीचे बनले आहे. ते लक्षात घेऊन शासनाने कर आणि विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी व्यापारी, व्यावसायिकांतून होत आहे.

जीएसटीची विवरणपत्र थ्री-बी भरण्याची मुदत २० ते २२ मार्चपर्यंत, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील आयकरचे विवरणपत्र आणि कामगारांच्या वेतनावरील सन २०१९-२० मधील प्रोफेशनल टॅक्स भरण्याची अंतिम मुदत दि. ३१ मार्च आहे. टीडीएस भरण्याची मुदत दि. ७ एप्रिलपर्यंत आहे.

कर, विवरणपत्रे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत भरण्याचे नियोजन बहुतांश करदात्यांनी केले होते. मात्र, त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील शासनाच्या आदेशानुसार आयकर, जीएसटी भवनमध्ये जाता येत नाही. दुकाने, व्यवसायाच्या ठिकाणी बहुतांश कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. त्यामुळे वार्षिक हिशेबाची पूर्तता करता येत नाही.

आॅनलाईन माहिती देणे-घेणे अडचणीचे ठरत आहे. हेल्प डेस्कद्वारे शंकांचे निरसन होत नाही. हॉटेल, ट्रान्स्पोर्ट, दुकाने, आदी क्षेत्रांतील बहुतांश व्यावसायिक, व्यापारी हे खेळत्या भांडवलातून कर भरण्याचे नियोजन करतात. मात्र, सध्या उलाढालच मंदावल्याने त्यांची अडचण झाली आहे.

‘जीएसटी’ची नवी प्रणाली लांबणीवरजीएसटीच्या नव्या प्रणालीची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून होणार होती. मात्र, जीएसटी कौन्सिलने ही अंमलबजावणी सहा महिने लांबणीवर टाकली आहे, अशी माहिती सीए चेतन ओसवाल यांनी दिली.

करदात्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही विवरणपत्रे भरण्याचे काम करतो. मात्र, कर्मचारी नसल्याने अनेक व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक करदात्यांकडून वार्षिक हिशेब पूर्ण करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शासनाने किमान १५ एप्रिलपर्यंत कर, विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ द्यावी.- चेतन ओसवाल, सीए.

कोरोनामुळे शासकीय कार्यालयांमध्ये जात येत नसल्याने विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेत अडचण येत आहे. केरळमधील महापुरावेळी शासकीय कार्यालये बंद होती. त्यावेळी तेथे करावरील दंड माफ केला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊन कर, विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवावी.- अमित पाटील, सीएस.

सध्या कोरोनोमुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे कर, विवरणपत्रे भरण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. आधार-पॅन लिंकिंग, आयकर विभागाच्या विवाद से विश्वास या नव्या योजनेसह आयकर, जीएसटी आणि त्यांची विवरणपत्रे भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ मिळावी म्हणून ‘महाराष्ट्र चेंबर’ने केंद्रीय अर्थमंत्र्यांना गुरुवारी फॅक्स पाठविला आहे.- ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरGSTजीएसटी