शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र टॉकीज पाडण्यास उच्च न्यायालयाची मनाई

By admin | Updated: December 13, 2015 01:22 IST

मुंंबई उच्च न्यायालयाचा निर्णय : कुरुंदवाडच्या संस्थानकालीन ऐतिहासिक थिएटरचे होणार जतन

कोल्हापूर : कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील संस्थानकालीन भालचंद्र टॉकीज व सहा इतर वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित कराव्यात, असे आदेश राज्य शासन व कुरुंदवाड नगरपरिषदेस देण्याची विनंती करणारी याचिका कुरुंदवाड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोकरे व इतर चारजणांसह अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होऊन कुरुंदवाड नगर परिषदेस भालचंद्र थिएटर पाडण्यास न्यायालयाने मनाई केली. कुुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, त्याचे संस्थान अधिपती पटवर्धन घराणे होते. त्यांच्या कार्यकालात कला, संस्कृती व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विष्णू मंदिर, गणपती मंदिर, भालचंद्र टॉकीज, गणपती रेसलिंग थिएटर, सध्याची सीताबाई पटवर्धन माध्यमिक विद्यालयाची इमारत, टेनिस क्लब या वास्तू बांधल्या. या वास्तू सांस्कृतिक वारसा म्हणून जतन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्या हेरिटेज नियमावलीप्रमाणे नगर परिषदेसही बंधनकारक आहेत; पण नगर परिषदेने भालचंद्र टॉकीजची भव्य आणि ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत असतानाही पाडून त्या जागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला होता. शहरातील नागरिकांनी त्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडेही विरोध नोंदविला होता. मात्र, कारवाई काहीच झाली नाही. त्यामुळे कृष्णा लोकरे व इतर चारजणांसह अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तिची नुकतीच सुनावणी झाली. त्यात भालचंद्र थिएटरची इमारत पाडण्यास मनाई केली.