घरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:00+5:302021-04-13T04:24:00+5:30

कोल्हापूर : गैरसमजातून बेकायदेशीरपणे घरात घुसून तीन महिलांसह चौघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील वाशी येथे घडला. ...

He broke into the house and beat up four people including a woman | घरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण

घरात घुसून महिलांसह चौघांना मारहाण

कोल्हापूर : गैरसमजातून बेकायदेशीरपणे घरात घुसून तीन महिलांसह चौघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार करवीर तालुक्यातील वाशी येथे घडला. या हल्ल्यात सुभाष विठ्ठल पुजारी, स्वाती विठ्ठल पुजारी, शीतल सुभाष पुजारी, द्रौपदी विठ्ठल पुजारी (सर्व रा. वाशी) हे जखमी झाले. याप्रकरणी सहाजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजी आनंदा पुजारी व सुभाष पुजारी हे दोघे शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री गैरसमजातून त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. यावेळी तानाजी पुजारी, आनंदा बापू पुजारी, पूनम तानाजी पुजारी, भारती आनंदा पुजारी, संभाजी आनंदा पुजारी, सचिन पाटील (सर्व रा. वाशी) यांनी सुभाष पुजारी यांच्या घरात घुसून गोंधळ माजवला. त्यांनी चौघांवर हल्ला करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात महिलांना केसांना पकडून ओढत आणले. तसेच शीतल पुजारी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांना जखमी केले. यामध्ये ते बेशुध्द पडले. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्याप्रकरणी सहाजणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: He broke into the house and beat up four people including a woman