शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचे पैसे जीवावर बेतले! कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या पुलाखाली मित्रानेच दगडाने ठेचून केला मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:53 IST

चोकाक येथील पुलाखाली खून

हातकणंगले : चोकाक (ता.हातकणंगले) येथील कोल्हापूर-सांगली राज्य मार्गाच्या पुलाखाली गुरुवारी सायंकाळी ७ वाजता मोबाईल खरेदीच्या पैशावरून सचिन ऊर्फ लालू सर्जेराव मुसळे (वय ३४, रा. अतिग्रे ता. हातकणंगले) या तरुणाचा त्याचा मित्र तुषार ऊर्फ पप्पू रवींद्र लोहार (३५ रा. चोकाक) या संशयिताने दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून केला. रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सचिन हा मुसळे एमआयडीसीमध्ये ठेकेदार म्हणून काम करीत होता. तुषार ऊर्फ पप्पू लोहार याच्याबरोबर सचिनची मैत्री होती. गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये मोबाईलच्या पैशावरुन वाद सुरू होता.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजता दोघे चोकाक येथील रस्त्याच्या पुलाखाली दारू पित बसले होते. यावेळी दोघात पैशावरुन वाद झाला. दारुच्या नशेत तुषार लोहारने सचिन मुसळेच्या डोक्यात दगड घातला. घाव वर्मी लागल्याने तो बेशुद्ध पडला. पुलाचे काम सुरू असल्याने तेथील परप्रातिंय कामगारांनी पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जखमी सचिन मुसळेला सी.पी.आर. रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले. डोक्यात गंभीर दुखापत होत रक्तस्त्राव झाल्याने दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी तुषार लोहारच्या शोधासाठी हातकणंगले पोलिसाची टिम रवाना झाली आहे. मृत सचिनच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आप्पासाहेब जाधव, जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. या खुनाचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mobile Money Turns Deadly: Friend Murders Friend in Kolhapur

Web Summary : A dispute over mobile phone money led to a fatal incident near Kolhapur. A man was murdered by his friend with a stone under a bridge after a drunken argument. Police are searching for the suspect.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस