विवाहितेचा छळ पतीसह सासू सासरे दिरावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST2021-04-03T04:22:17+5:302021-04-03T04:22:17+5:30

पेठवडगाव:माहेरुन पैसे आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यासह तलाक देऊन घरातून हाकलून दिल्याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चौघांवर वडगाव ...

Harassment of marital in-laws with husband | विवाहितेचा छळ पतीसह सासू सासरे दिरावर गुन्हा

विवाहितेचा छळ पतीसह सासू सासरे दिरावर गुन्हा

पेठवडगाव:माहेरुन पैसे आणावेत यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यासह तलाक देऊन घरातून हाकलून दिल्याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चौघांवर वडगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी पती महंमद शोएब मकसूद मोमीन, सासू शमशाद मकसूद मोमीन, सासरे मकसूद हाजीअजीज मोमीन, दीर शहाबाज मकसूद मोमीन यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अंजुम महंमदशोएब मोमीन (वय २७ रा. भादोले रोड, वडगाव) हिने फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी, इचलकरंजी येथील अंजुम हिचा २०१७ मध्ये येथील महंमद शोएबसोबत लग्न झाले आहे. अंजुम व तिचा पती दोघही पुणे येथे नोकरीस होते. परंतु अंजुम हिला नोकरी करण्यास विरोध दर्शवत तिच्यावर संशय घेत होता. तसेच सासरच्या नातेवाइकांनी मानसिक व शारीरिक छळ केला होता. दोनवेळा तिच्या सासरच्या मंडळींची समजूत घालण्यात आली होती. पण त्यानंतरही माहेरुन पैसे आणावेत यासाठी तिचा छळ सुरू होता. विविध कारणांवरून पतीसोबत सतत वाद होत असल्याने त्यातूनच ७ मार्चला पतीने तलाक देतो, असे सांगत तिला घरातून हाकलण्याचे अंजुम हिने फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Harassment of marital in-laws with husband