शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिवार अभियानासाठी शासनाने कसली कंबर

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, गाववार ३० डिसेंबरला ग्रामसभांचे आयोजन

प्रकाश पाटील - कोपार्डे -पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे गेल्या काही वर्षांपासून सर्वच जिल्ह्यांत सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. सिंचनच्या सुविधांचा विचार करता मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनींचे मोठे प्रमाण यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणाऱ्या अनिश्चिततेने विकासात मोठा अडथळा ठरत आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ राबविण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, गाववार ३० डिसेंबरला ग्रामसभांचे आयोजन करून त्याबाबत जनजागृती शासनाने सुरू केली आहे.राज्यात सतत उद्भवणारी टंचाईसदृश्य परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१०’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाद्वारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मागील दोन वर्षांत राज्यात साखळी सिमेंट कॉँक्रिटला बांध कार्यक्रम, महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान राबविले आहे. यामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, के. टी. वेअर दुरुस्ती, जलस्त्रोतातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, ओढे-नाले जोडकामे हाती घेण्यात आली. या सर्व कामांच्या माध्यमातून ८.४० टी.एम.सी. क्षमतेचे विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे भूजल पातळीत एक ते तीन मीटरने वाढ झाली असून, पिण्याचे पाणी व शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. याचा अनुभव घेऊनच शिवार अभियान राबविण्यात आले आहे.यातून पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविण्याने भूजल पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न करणे, विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणे, अस्तित्वातील असणाऱ्या जलस्त्रोतातील गाळ लोक सहभागातून काढून जलस्त्रोतातील पाणीसाठ्यात वाढ करणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ धोरण ठेवणे यांसह १३ उद्देश साध्य करण्याचे धोरण ठेवले आहे.यासाठी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गावपातळीवरील आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी शिवार भेट करून केंद्राभिमुख आराखडा तयार करावयाचा आहे. विस्तार अधिकारी कृषी, मंडळ कृषी अधिकारी, मंडल अधिकारी यांची जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक करून त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत शिवार भेट करून, गावाच्या गरजा विचारात घेऊन, गाव आराखडा निर्माण करून त्याची ग्रामसभेत मंजुरी घ्यावयाची आहे.