प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 19:02 IST2021-03-03T19:00:05+5:302021-03-03T19:02:40+5:30

Crime News Police Kolhapur- दरोडा टाकण्याच्या तयारीने मोटारीतून कोल्हापुरात आलेल्या पाच दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीला सायबर चौकात राजारामपुरी पोलिसांनी नियोजनबद्दरीत्या सापळा लावून पकडले. या टोळीकडून एका मॅगझीनसह पिस्तूल, चार जिवंत राऊंड, दोन तलवारी, दोरी, बाटऱ्या असा प्राणघातक शस्त्रसाठ्यासह कार जप्त करण्यात आली.

A gang of five robbers with deadly weapons went missing | प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड

प्राणघातक शस्त्रासह पाच दरोडेखोरांची टोळी गजाआड

ठळक मुद्देपिस्तूल, तलवारी, जिवंत राऊंडसह शस्त्रसाठा जप्त राजारामपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : दरोडा टाकण्याच्या तयारीने मोटारीतून कोल्हापुरात आलेल्या पाच दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीला सायबर चौकात राजारामपुरी पोलिसांनी नियोजनबद्दरीत्या सापळा लावून पकडले. या टोळीकडून एका मॅगझीनसह पिस्तूल, चार जिवंत राऊंड, दोन तलवारी, दोरी, बाटऱ्या असा प्राणघातक शस्त्रसाठ्यासह कार जप्त करण्यात आली.

मंगळवारी रात्री उशिरा सायबर चौकात ही घटना घडली, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

अटक केलेल्या संशयितांची नावे : अजिंक्य मनोहर भोपळे (वय २८, रा. कोपरीगाव, वाशी, नवी मुंबई. मूळ गाव - चोकाक, ता. हातकणंगले, कोल्हापूर), जयवंत सर्जेराव साळवे (३६, रा. कोपर्डी हवेली, ता. कऱ्हाड, जि. सातारा), दीपक जनार्दन आडगुळे (३०, रा. वडोली रोड कोपर्डी हवेली, ता. कऱ्हाड), अनिल आनंदा वायदंडे (४९, रा. वनवडी जलविहार कॉलनी, ता. कऱ्हाड), वैभव दादासाहेब हजारे (२६, रा. विद्यानगर बनवडे फाटा, ता. कऱ्हाड).

 

Web Title: A gang of five robbers with deadly weapons went missing