कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर स्मशानशांततेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 19:12 IST2021-04-10T19:11:00+5:302021-04-10T19:12:19+5:30

CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.

Funeral in Coronation for those who died of corona | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर स्मशानशांततेत अंत्यसंस्कार

 कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गर्दी असते. मात्र, शनिवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नियमित मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर निर्मनुष्य परिस्थितीत अंत्यसंस्कार झाले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर स्मशानशांततेत अंत्यसंस्कार दिवसभर कोरोनाचे पाच, तर नियमित नऊजणांचा समावेश

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी रात्री बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीत पाच कोरोनाबाधित मृतदेहांवर गॅसदाहिनीत विना नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी आपलेच नातेवाईक असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले. नऊ नियमित मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले.

इतरवेळी स्मशानभूमीत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत शनिवारी मात्र अगदीच नगण्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्याचे चित्र होते. त्यामुळे स्मशानभूमी असली तरी या स्मशानभूमीत वर्दळ असते. मात्र, शनिवारी दिवसभर अगदीच शब्दाप्रमाणे स्मशानशांतता होती.
 

Web Title: Funeral in Coronation for those who died of corona