शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

महागावात फळविक्री व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील फळविक्री व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला असून, महिन्याला १० ते १५ लाखांचा उलाढाल ठप्प ...

महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील फळविक्री व्यवसाय कोरोनामुळे ठप्प झाला असून, महिन्याला १० ते १५ लाखांचा उलाढाल ठप्प आहे. कोरोनामुळे बाहेरून येणारा मालही न आल्याने व्यवसायावर मंदीचे सावट आहे. केळी, आंबा या दोनच फळांची आता विक्रेते विक्री करताना दिसत आहेत.

गडहिंग्लज तालुक्यासह महागावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सफरचंद, मोसंबी, संत्री, अननस, किवी, ड्रॅगनफ्रुट, पेरू या फळांतून मोठ्याप्रमाणात जीवनसत्त्वे मिळतात. रुग्णांना फळांचा मोठा आधार असतो. काही वेळा रुग्ण आहार घेत नाही. अशावेळी फळांचे रस त्यांना पोट भरण्यासाठी व थकवा दूर करण्यासाठी या फळांचा उपयोग होत असतो. आज रुग्णांचे नातेवाईक फळविक्रेत्यांकडे फळांची सातत्याने मागणी करत आहेत. मात्र, बेळगाव, निपाणी, कोल्हापूर या ठिकाणांहून फळे आणणेही शक्य नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करणे जिकिरीचे बनले आहे. एप्रिलपासून हा व्यवसाय ठप्प आहे.

त्यामुळे प्रशासन व ग्रामपंचायतीने अनेकवेळा लॉकडाऊन केला आहे. बाहेरून येणारे विविध फळे लॉकडाऊनमध्ये आलेली नाहीत. त्यामुळे स्थानिक उपलब्ध होणारे केळी व आंबा ही फळे विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून सध्या फळविक्रेत्यांचे उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे गावातील सुमारे १५ ते २० फळविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.